आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी पाहुण्यांचे निरीक्षण, वैशिष्ट्ये जाणून घेताना रमले पर्यावरणप्रेमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नेचर काॅन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी रविवारी सकाळी बोचऱ्या अाणि धुक्याने दाटलेल्या थंडीत हिप्परगा तलाव परिसरात पक्षी निरीक्षणाची कार्यशाळा घेतली. या डिसेंबर ते जानेवारीच्या मौसमात येथील पाणवठ्यांवर मोठ्या परदेशी पाहुणे पक्षी येतात. त्यांचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी हौशी पर्यावरणप्रेमींनी हजेरी लावली होती.

रविवारी सकाळी साडेसहा वाजता पक्षी निरीक्षण सुरू झाले. त्यासाठी पाच गट तयार केले होते. प्रत्येक ग्रुप आेळख भरत छेडा यांनी करून दिली. ८० जणांचा सहभाग घेतला. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थिनींचा सहभाग होता. संयोजकांनीच दुर्बिणीची व्यवस्था केली होती.

यांनी दिली पक्ष्यांची माहिती
शिवानंद हिरेमठ, निनाद शहा, राहुल वंजारी, मुकुंद शेटे, वैभव वंजारी,अभिषेक देशपांडे, रणजित शेळके, आनंद चव्हाण, नागेश राव, शिवाई शेळके, मोहित,अजित चौहान,पप्पू जमादार.

हे दिसले पक्षी : राखी बगळा, रात बगळा, बुलबुल, तरंग बदक, शेकाट्या, स्पूनबील, चित्रबलक, राबिन, होला, सातभाई, फ्लेमिंगो, मार्श हारिअर, ब्राह्मणी काईट, घार, हंस इत्यादी.
बातम्या आणखी आहेत...