आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनमहोत्सव सप्ताहात राज्यभर लावणार दाेन कोटी रोपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तेजुलै या वनमहोत्सव सप्ताहात राज्यभर कोटी रोपे लावण्यात येणार आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के भागावर वृक्षाच्छादन आणि वनीकरण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम घेण्यात आली. पहिल्याच दिवशी कोटी रोपे लावण्यात येतील. त्यानंतर त्याच्या संगोपनाचे उपाय योजण्यात येणार आहेत. सहकार आणि पणन खात्यानेही त्याचे उद्दिष्ट घेतले. प्रत्येक कार्यालय परिसरात किमान २० रोपे लावण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय वननीतीच्या १९८८ मधील धोरणानुसार ही मोहीम सुरू होईल. राज्यातील ३०७ लाख हेक्टर भाैगोलिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर जमीन वृक्षाच्छादित आहे. हे प्रमाण साधारणपणे २० टक्के आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदललेला निसर्ग अन् ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ या माध्यमातून निसर्गाच्या असमतोलाची जाणीव होत आहे. त्यावर उपाय म्हणूनच ते जुलै हा वनमहोत्सव सप्ताह घेण्यात येणार आहे. त्यात केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर सेवाभावी संस्था, सामाजिक संघटनाही सहभागी व्हाव्यात, असे अपेक्षित असल्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमल होण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (नागपूर) यांना समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिवाय मंत्रालयातील वनविभागाचे सचिव स्तरावरील अधिकारीही कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणार आहेत.

सोलापूरमधील साखर कारखान्यांत १०० रोपे
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. उसाला प्रचंड प्रमाणात पाणी लागते. वाढत्या उसाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर वनमहोत्सवात साखर कारखान्यांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली. कारखाना परिसरात १०० रोपे लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यावर सहकार खात्याचे कटाक्षाने लक्ष असणार आहे. पाण्याचे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना दंडनीय पाणीपट्टी आकारण्याचे परिपत्रक जलसंपदा विभागाने नुकतेच काढले. त्यावर आता वृक्षलागवडीचे लक्ष्यही देण्यात आल्याने कारखान्यांवर मोठी जबाबदारी राहील.

{सहकारी गृहनिर्माणसंस्था
{लहान सहकारीसंस्था
{सूत गिरण्यांचापरिसर
{साखर कारखानापरिसरात
{सहकारी संस्थांच्यापरिसरात
{प्रत्येक कार्यालयाच्यापरिसरात