आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदित अभिनेत्रीवर आमदार पुत्राचा बलात्‍कार, गुन्‍हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
सोलापूर - एका नवोदित अभिनेत्रीवर माजी आमदार तथा भाजप नेते सिद्धराम पाटील यांचा मुलगा सुमित याने बलात्‍कार केल्‍याची तक्रार गोरेगाव पोलिस ठाण्‍यात 15 दिवसांपूर्वी दाखल झाली. एवढेच नाही तर आपला अश्लिल व्‍ह‍िडिओसुद्धा बनवला असा आरोपही पीडित युवतीने केला आहे. त्‍या आधारे पोलिसांनी गुन्‍हा केला आहे. सध्‍या सुमित हा जामिनावर बाहेर आहे. पीडित युवतीने अनेक टीव्‍ही मालिका आणि मराठी चित्रपटांत भूमिका केली आहे.

अशी केली फसवणूक
पीडित मुलीने दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले, सुरुवातीला सुमित आपल्‍या एसएमएस पाठवत असे. त्‍यातून आमच्‍यात मैत्री झाली. दरम्‍यान, त्‍याने प्रेमाच्‍या भूलधापा आणि मोठ्या चित्रपटात काम देण्‍याचे आश्‍वासन आणि लग्‍नाचे अमीष दिले. नंतर पुणे, मुंबई आणि सोलापूरध्‍ये अनेक वेळा लैगिंग छळ केला. त्‍यातून मला दिवस गेले. मात्र, सुमित याने गर्भपात करण्यास भाग पाडले आणि लग्नासही नकार दिला, असे आरोप पीडित मुलीने केला आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्‍याची दिली धमकी