आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडशी: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष करंडे यांचे अपघाती निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामेश्वर करंडे यांचे शनिवारी (दि. १८) रात्री उशिरा कार अपघातात निधन झाले, तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावर घडला. 
माहितीनुसार, रामेश्वर करंडे (५४), माजी उपसरपंच गजानन नलावडे, व्यापारी रामलिंग भोसले हे सर्वजण स्वीफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच १२ एन ७१००) कामानिमित्त मुंबईला गेले होते.तेथून परतताना पुणे-मुंबई महामार्गावर समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने कार त्यावर आदळून पुन्हा दुभाजकावर आदळली. यात करंडे यांचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले. त्यांना निगडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबतचे वृत्त मध्यरात्रीनंतर येडशी समजताच गावावर शोककळा पसरली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून करंडे यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह येडशी येथे दाखल झाला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डाॅ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जीवनराव गोरे, सुरेश देशमुख, संजय दुधगावकर, सुरेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
सामान्यकार्यकर्ता ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत प्रवास : मुळचेव्यावसायिक असलेल्या रामेश्वर करंडे यांनी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता तथा डॉ. पाटील यांचा खंदा समर्थक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. याच बळावर त्यांना १९९७ मध्ये राष्ट्रवादीकडून येडशी गटातून उमेदवारी नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. ते २००२ पर्यंत अध्यक्षपदी होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

उत्सवावर शोककळा 
शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच शिवजयंतीनिमित्त फटाके फोडून जन्मोत्सव साजरा केला जात होता. परंतु, तासाभरातच अपघाताबाबतचे वृत्त पसरताच हा आवाज शांत झाला. गावात जागोजागी शिवजयंतीसाठी उभारलेले स्टेज, शामियानेही ‘जैसे थे’ राहिले. 
बातम्या आणखी आहेत...