आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वीज कोसळून चौघांचा मृत्यू, 5 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आज दुपारी राज्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासाह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) दुपारी 3 वाजेच्या सुमारास मोहोळ येथे घडलेल्या घटनेत योगेश भोसले (रा. पापरी) आणि पाडुरंग लबडे (रा. हीवरे) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दुसरीकडे धुळ्यात पावसामध्ये झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघी मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापरी येथे योगेश सुनील भोसले हा 20 वर्षीय तरूण आपल्या शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला होता. दरम्यान, दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरू झाली. यावेळी अंगावर वीज कोसळ्याने त्यांचा दुर्देवी अंत झाला. दुसऱ्या घटनेत हिवरे येथे पांडूरंग चागदेव लबडे हे सदाशिव डीकरे यांच्या शेतात इतर मजरांसह ज्वारी पेरणीचे काम करत होते. दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने सर्वजण शेतालग असलेल्या मंदिरात आडोशाला बसले. तेवढ्यात मंदिरावरच वीज कोसळल्याने त्यात पांडरंग लबडे यांचा मृत्यू झाला, तर पाज जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्नालया दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील रुग्नालयात हलवण्यात आले आहे.  

धुळे: वीज कोसळून दोघी माय-लोकींचा दुर्देवी मृत्यू....
झालाखाली आडोसा घेतलेल्या दोघा माय-लेकींचा वीज कोसळून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गव्हाणे येथे दुपारी दोन वाजेच्या सूमारस घडली. सिंदखेडा येथील सुरेखा दगडू पाटील (वय 50) व मुलगी मोनीका दगडू पाटील (वय 18) असे दोघी मायलेकीचे नाव आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककला पसरली आहे. दुसरीकडे सुखवद येथे सर्जेराव पाटील याच्या शेतात झोपडीवर वीज पडून झोपडीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जिवितहाणी झाली नाही.
बातम्या आणखी आहेत...