आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकेत आटकळे खून प्रकरण: तत्कालीन पीआयसह चार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- शेगावदुमाला येथील संकेत आटकळे खूनप्रकरणी येथील तालुका पाेलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पोलिस महासंचालकांनी रोखली आहे. २०१३ मध्ये झालेल्या पाचवर्षीय संकेतच्या खून प्रकरणाचा व्यवस्थित तपास करता संशयितांना सहकार्य केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, हेडकाॅन्स्टेबल राजाराम वाघमोडे, एम. एम. मोमीन, विलास माने यांचा यात समावेश आहे. 


संकेतचे अपहरण करून खून करण्यात आला. मात्र, तालुका पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांना अटक केली नव्हती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर एक महिन्यांनी संशयितांना अटक केली. परंतु व्यवस्थित तपास करता संशयितांना सहकार्य केल्याची पोलिस प्रशासनाने दखल घेतली होती. 


तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांनी तालुका पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने करमाळ्याचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पाटील यांनी प्राथमिक चौकशी केली. त्यात पोलिस निरीक्षक जाधवसह चार कर्मचारी दोषी आढळल्याने अपर पोलिस महासंचालकांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दिलीप चौगुले यांनी चौकशी करून जानेवारी महिन्यात पोलिस महासंचालक कार्यालयास अहवाल दिला. चौकशी आणि त्यानंतर सुनावणीत दोषी आढळल्याने तत्कालीन पोलिस निरीक्षक जाधव यांच्यासह पाचजणांवर कारवाई करण्यात आली. 


पदाेन्नती थांबणार, पेन्शनमधून कपात 
याखून प्रकरणाचा तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी तपास केला होता. मात्र, संशयितांशी आर्थिक हितसंबंध जोपासत त्यांना सहकार्य करत सुखसुविधा पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला. सुनावणीत त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली गेली. त्यातही ते दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जाधव यांची पदोन्नती थांबली आहे. कारवाई होण्याआधीच हेडकाॅन्स्टेबल वाघमोडे हे उपनिरीक्षक होऊन सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या पेन्शनमधून ती रक्कम कपातीचे आदेश देण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...