आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Freedom Fighters Contribution In Freedom Struggle

स्वातंत्र्य लढ्यात चार हुतात्म्यांचे महान योगदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरचा सहभाग मोठा अाहे. येथील राजकीय घटनांनी संपूर्ण देशाला दीपवून टाकले होते. त्यापैकी ‘मार्शल लॉ’चा काळ अगदी धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. स्वातंत्र्याच्या इतिहासात या शहराचे वर्णन ‘शोलापूर’ असे केले गेले. १२ जानेवारी १९३१ रोजी या शहरातील चार तरुण देशभक्तांना फासावर चढवण्यात आले. त्यात मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे, अब्दुलरसूल कुर्बानहुसेन यांचा त्यात समावेश अाहे.

महात्मा गांधीजींनी १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्याचे लोण संपूर्ण देशात फोफावले होते. सोलापूर शहरही त्याला अपवाद नव्हते. मे १९३० रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गांधीजींच्या अटकेची वार्ता सोलापुरात येऊन धडकली. त्याचे शहरात प्रचंड पडसाद उमटले.
सरकारच्या विरोधातील प्रचंड असंतोष व्यक्त होत होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत लाठीमार, गोळीबार सुरूच होता. मेचा तो काळा दिवस आला. सरकारने वीर नरिमन या युवक संघाच्या प्रमुखास अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते टिळक चौकात आले. तिथे सभा सुरू झाली. सरकारविरोधी घोषणा सुरू झाल्या. एक जमाव रूपाभवानीच्या दिशेने निघाला. पोलिसांनी ही खबर वरिष्ठांना कळवली. नॅपेट नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने दोन ट्रक पोलिसांना पाचारण केले. त्याने जणांना पकडले.

कलेक्टर नाइट पिस्तुल घेऊन आंदोलकांसमोर आला. त्याने जमाव अधिक भडकला. पकडलेल्या लोकांना सोडून देण्याची मागणी जमावाने केली. ती मान्य नसल्याने दगडफेक सुरू झाली. तणाव वाढला. गोळीबार सुरू झाला. त्यात शंकर शिवदारे गोळी लागून कोसळले.जमाव भडकला जाळपोळ सुरू झाली. मार्शल लॉमध्ये पकडलेल्या सर्वांवर खटले भरले. शिक्षा झाल्या. त्यात चार हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली. तो दिवस सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा होता. त्या वर्षी यात्रा झाली नाही. पण हुतात्म्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले.

गिरणी कामगार उतरले रस्त्यावर
गिरणीकामगार रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी सुरू झाली. महिलांनी स्वतंत्र मोर्चा काढला. एका जमावाने मद्रास मेल अडवली होती. रूपाभवानी परिसरातील शिंदीची झाडे तोडण्याचा सत्याग्रह केला होता. त्यांच्यावर गोळीबार झाला. मे १९३० चा दिवस उजाडला. तो अत्यंत प्रक्षोभक वातावरणातच. लक्ष्मी-विष्णू गिरणीजवळ पोलिसांना गोळीबार करावा लागला. रस्त्यावर लाेकांचे लोंढे आले. त्यांनी पोलिसांची हुर्रे उडवली. गांधी टोपी घालण्यास लावली.