आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांच्या विक्रीतून दररोज चार लाखांची उलाढाल; सणांमुळे दरात तिपटीने वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गणेशोत्सव, महालक्ष्मी बकरी ईदच्या सणांमुळे फुलांच्या विक्रीतून होणारी उलाढाल रोज चार लाखांपर्यंत पोहोचली आहे. शहरात सद्यस्थितीत दररोज सरासरी दोन टन ६०० किलो फुलांची विक्री होत आहे. पुणे, बंगळुरू, हैदराबाद, सोलापूर येथून फुले शहरात आणावी लागत आहेत. तसेच रोज ८५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
 
सध्या सण उत्सवांचे दिवस आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत पावसानेही बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर फुलांच्या बाजारात बऱ्यापैकी तेजी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी गणरायांचा १२ दिवसांचा मुक्काम आहे. अशात नुकताच महालक्ष्मीचाही सण झाला.
 
शनिवारी बकरी ईद साजरी होत आहे. एकूणच सध्याचे दिवस सणांनी गजबजलेले आहेत. गणरायाची पूजा फुलांच्या हारांशिवाय केली जात नाही. यामुळे फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. शहरात सद्यस्थितीत सर्वच प्रकारच्या फुलांचा एकत्रित विचार केला तर रोज हार तयार करण्यासाठी सुट्याविक्रीसाठी दाेन टन ६०० किलो फुलांची गरज पडत आहे. यातून सुमारे चार लाख रुपयंाची उलाढाल होत आहे.
 
मोठ्या दुकानांतून रोज ४० हजार रुपयांची फुलांचे हार फुले विक्री होत आहेत. शहरातील ११२ गणेश मंडळे याशिवाय शहराच्या परिसरातील सुमारे ४८ गावांमधील गणेश मंडळे घरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करणारे भक्त फुलांच्या हारांची दरराेज मागणी करतात. शहरात १८ फुलांचे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे पहाटेपासून ग्राहकांची सातत्याने रिघ लागलेली असते. अन्य दिवसांपेक्षा या कालावधीत पाच पटीने विक्रीत वाढ आहे. 
 
तीनपट दर : सद्य स्थितीतफुलांच्या दरामध्ये सुमारे तीनपटीने वाढ झाली आहे. अन्य वेळी पाच ते १० रुपयांना विकला जाणारा हार २५ ते ३० रुपयांपर्यंत विकला जात आहे. असे ८०० ते १००० रुपयांपर्यंतचे मोठे हार विकले जात आहेत. विशेष व्यक्तींच्या हस्ते पूजेच्या वेळी अशा हारांची मागणी गणेश मंडळांकडून केली जाते. अन्य वेळी हेच हार ३०० ते ४०० रुपयांना उपलब्ध असतात. 
 
८५ जणांना रोजगार : शहरातकेवळ हार तयार करण्यासाठी ८५ मजूरांची गरज पडत आहे. यामुळे त्यांच्या हाताला सध्या काम मिळाले आहे. सकाळी ते रात्रीपर्यंत ४०० रुपये रोजगार दिला जात आहे. प्रत्येक मोठ्या दुकानांमध्ये ते १० मजूर रोज हार तयार करण्याचे काम करत आहेत. 
 
झेंडूची अधिक विक्री 
फुलांमध्ये गुलाब सुमारे ४०० ते ५०० किलो, शेवंती सुमारे ८०० ते ९०० किलो, निशिगंध ७०० किलो तर झेंडूची फुले १५०० ते १७०० किलो लागत आहे. सर्वाधिक प्रमाणात फुलांचे हार तयार केले जातात. निशिगंधाच्या हारांनाही यावर्षी चांगली मागणी आहे. बकरी ईदला शेवंतींच्या फुलांची चादर मजारवर चढवली जाते. यामुळे शेवंतीलाही चांगली मागणी आहे. 
 

मागणीत वाढ 
यावर्षी फुलांचाबाजार तेजीत आहे. ग्राहकांमध्येही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांचे प्रमाण वाढलेले आहे. पाऊस झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह आहे. गतवर्षीपेक्षा यावेळी चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- रियाजशेख, फूल विक्रेते. 
 
कर्नाटकातून येतात फुले 
गुलाब शेवंतीची फुले सर्वाधिक बंगळुरूहून आणली जात आहेत. तसेच निशिगंधाची आयात पुण्याहून होत आहे. झेंडू मात्र, स्थानिक शेतकऱ्यांकडून विकत घेतला जात आहे. अन्य वेळी अनेक शेतकऱ्यांचे झेंडूंचे फड जागेवरच वाळले होते. आता मात्र, झेंडूंची मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. 
बातम्या आणखी आहेत...