आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस दस्तप्रकरणी चौदा जणांवर झाले गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शेळगीमजरेवाडी येथील खुल्या जागेची विक्री बोगस व्यक्ती दाखवून विक्री केल्याप्रकरणी सह. दुय्यम निबंधक मधुकर भूतकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शेळगी येथील प्रकरणामध्ये १० जणांवर तर मजरेवाडी येथील प्रकरणात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही दस्त नोंदणी बोगस कागदपत्रे तोतया व्यक्तींना उभे करून खरेदी करण्यात आल्याचे सह. दुय्यम निबंधक मधुकर भूतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
शेळगी श्रीदेवी भीमाशंकर जावळे यांच्या मालकीची सिटी सर्व्हे क्रमांक ६२८/ब/९ पैकी प्लॉट क्रमांक या जागेची फेब्रुवारी २००९ रोजी नोंदणी केली होती. ही नोंदणी करताना खोटी माहिती बोगस कागदपत्रे जोडण्यात आले आहे. या प्रकरणात श्रीदेवी जावळे यांच्या ठिकाणी तोतया महिला ललिता पटणे यांना उभे करून हक्कसोडपत्र करण्यात आले होते. यामध्ये शिवम्मा सिद्रामण्णा कोटीवाले, महादेवी सिद्रामप्पा कोटीवाले, सुशीला सुभाष इचगे, जगदेवी कलप्पा चनशेट्टी, शैला चंद्रकांत सुकरे, शरणप्पा सिद्राम वाले, श्रीशैल शरणप्पा वाले, तोतया महिला ललिता पटणे, आेळख देणारे शशिकांत नारायण शेट्टीकर, इसाक याकूब शेख या १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मजरेवाडी येथील प्रकरणात चारजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मजरेवाडी येथील सिद्धेश्वर तिप्पण्णा दुंबाळी यांच्या मालकीची नवीन सर्व्हे क्रमांक ११/१ या मिळकतीचा एप्रिल २०१४ रोजी दस्त करताना बोगस खोटी कागदपत्रे देऊन दस्त नोंदणी करण्यात आली. यामध्ये लिहून घेणार इक्बाल हुसेन रियासत अली खान, मान्यता देणार अजरोद्दीन जब्बार शेख, एजाज अब्दुल गनी शेख मुनाज अहमद अब्दुल गनी शेख अनोळखी तोतया इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिद्धेश्वर दुंबाळी यांच्याठिकाणी अनोळखी व्यक्ती उभी करून ही खरेदी केली आहे.
बोगस कागदपत्रे देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही

बोगसदस्त करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मागील वर्षभरात पोलिसांकडे १० पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तोतया व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी होत असताना त्यांना देण्यात आलेले आधारकार्ड, मतदान ओळखपत्र वा रेशनकार्ड बोगस असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र ही कागदपत्रे बोगस असतील तर ती कोणत्या अधिकारी यांच्याकडून देण्यात आली ? याचा मात्र पोलिसांनी तपास केला नाही. ती बोगस कागदपत्रे देणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई का झाली नाही.