आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीचे आमीष दाखवून 6 लाख रुपयांचा घातला गंडा, औरंगाबादच्या एकावर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आणि वॉटर प्लांटचा परवाना काढून देण्याचे आमीष दाखवून एकाने आवाटी येथील शेटे कुटुंबीयांची सहा लाखांची फसवणूक केली. गतवर्षी हा प्रकार घडला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध येथील पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भरत दीनानाथ वाहुल (वय ४७, रा. गौतमनगर, जालना रोड, औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी दीदार शेटे यांनी फिर्याद दिली. ३० मार्च २०१६ ते २० सप्टेंबर २०१६ या कालावधीत संशयित भरत याने मंत्रालयात सचिवांचा स्वीय सहायक म्हणून कामास असल्याची शेटे कुटुंबीयांना थाप मारली. त्यांच्या कुटंुबातील सदस्याला त्यांच्या नातेवाइकाला शिपाई, तलाठी, लिपीक आदी सरकारी नोकरी लावण्याचे आमीष दाखवले. तसेच वॉटर प्लांटचा परवाना काढून देतो, असेही सांगितले. बनावट शासकीय आदेश दस्तऐवज तयार करून शेटे कुटुंबीयांना आमीष दाखवून सहा लाख रुपये उकळले. याप्रकरणी हवालदार विजय शेळकांंदे तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...