आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवासीन जेवणाचे आमंत्रण देऊन चोरट्याने दागिने काढून घेतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आमच्या घरी सुवासिनीचे जेवण आहे. तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगत एका चोरट्याने ज्येष्ठ महिलेला मैैदानात नेऊन दागिने काढून घेतले. तब्बल दीड-दोन तास ती महिला मैदानात बसून होती. कालांतराने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली. सिमंताबाई मारुती शिंदे (वय ७०, तोडकरवस्ती, बाळे) यांनी फिर्याद दिली आहे.

श्रीमती शिंदे या घरासमोर पाणी भरत होत्या. त्यावेळी एक तरुण दुचाकीवर आला. मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. आमच्या घरी सुवासीन जेवण आहे असे सांगत, दुचाकीवरून ठोकळनगरात आणला. तुम्हाला नवीन साडी आणतो, दागिने नवीन करून आणून देतो म्हणून सात ग्रॅम दागिने काढून घेतले. तुम्ही इथेच थांबा दागिने आणतो म्हणून म्हणून गेला. तो आलाच नाही. कालांतराने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नातेवाइकांना घेऊन त्या पोलिसात आल्या.
पाच दिवसांपूर्वी जुळे सोलापुरात घरात देवीची परडी भरायची आहे म्हणून एका महिलेला दुचाकीवर नेऊन दागिने काढून घेतले होते. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडला. महिनाभरातील बारावी घटना आहे. ४० तोळे दागिने चोरीस गेले आहे. या घटनांचा तपास मात्र शून्य आहे.

व्यंकटेश हॉस्पिटलमध्ये चोरी
व्यंकटेश हॉस्पिटलमधून प्रमिला गवळी (बाभूळगाव, मोहोळ) यांच्याजवळील एक तोळ्याचे दागिने चोराने पळवले. फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. गवळी या आईसोबत बोलत होत्या. त्यांची नजर चुकवून बॅगेतील दागिने घेऊन चोर पळून गेला.

महिलांना ही कारणे सांगून गंडवले जाते
आम्ही पोलिस आहोत दागिने काढून ठेवा. दंगल सुरू आहे, नाकाबंदी तपासणी सुरू आहे, पॉलिस करायचे आहे असे सांगून गंडवण्यात येते. पत्ता विचारण्याचा बहाणा करून मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकारही झाले आहेत. महिलांनो सावधान; दागिने कुणाला देऊ नका

दागिन्यांची काळजी घ्या
^गुरुवारी विजयादशमी (दसरा) आहे. दागिने घालून जाताना सावधान राहा. मंगळसूत्र घातल्यास त्यासोबत साडीला पीन लावा. दंगल सुरू आहे, नाकाबंदी आहे, दागिने काढून ठेवा असे कुणी म्हणत असेल तर आरडाओरड करून मदत घ्या. कोणीही पोलिस दागिने काढून ठेवा म्हणून सांगत नाहीत. दागिने घातल्यानंतर मोकळ्या मैदानातून जाऊ नका. जागोजागी पोलिस बंदोबस्त आहे. अप्रिय घटना घडल्यास पोलिसांची मदत घ्या. रवींद्रसेनगावकर, पोलिस आयुक्त