आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षापासून ११ वी शास्त्र, वाणिज्य प्रवेश होणार ऑनलाइन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुढील वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन होणार आहे. शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे सुरुवातीला विज्ञान आणि वाणिज्य शाखांचे प्रवेश ऑनलाइन प्रणालीने केले जातील. यामुळे पालक विद्यार्थ्यांना दिला मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागला आहे.

वालचंद कला शास्त्र महाविद्यालयात शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलवण्यात आली होती. ३५ प्राचार्य उपस्थित होते. यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रिया, जागांसह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. साधारणपणे सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होतात. फक्त अकरावी प्रवेश प्रक्रियाच ऑफलाइन पद्धतीने होत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची पालकांची मागणी होती. परंतु नामवंत महाविद्यालये अडथळा निर्माण करत होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व प्राचार्यांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंबंधीच्या ठरावावर सह्या केल्या. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाचा विषय मार्गी लागला असून वाणिज्य विज्ञान शाखेसाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविण्यात येईल.

मान्यता घेणार
अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी याबाबत सर्व प्राचार्यांनी संमती दिली आहे. त्यानुसार दहा सदस्यीय समिती गठित केली आहे. प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतरच ऑनलाइन प्रक्रिया राबवली जाईल. सूर्यकांत सुतार, उपनिरीक्षक, सहायक शिक्षण

वालचंद महाविद्यालयात अकरावी प्रवेशासंदर्भात मंगळवारी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला शहरातील ३५ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

समितीचे स्वरूप
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी दहा सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीचे सचिव शिक्षणाधिकारी असतील. अध्यक्ष म्हणून वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे यांना नियुक्त केले. उरलेल्या आठ सदस्यांची निवड पुणे शिक्षण उपसंचालक करतील. गठित करण्यात आलेली समिती सर्वांना माहिती पाठवणे, जाहीर निविदा काढून काम करण्याचा ठेका कोणाला द्यायचा याबद्दल िनर्णय घेतील.
बातम्या आणखी आहेत...