आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरेगाव वृद्धाश्रम, स्मशानभूमीतील सेवेकऱ्यांना फराळाचे वाटप; चेहऱ्यावर फुलला अानंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर पोलिस अायुक्तालय मुख्यालयात काम करणारे सफाई कामगार, कार्यालयीन कामगारांना मंगळवारी पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते कपडे, फराळाचे वाटप करण्यात अाले. यावेळी उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते, निरीक्षक यशवंत केडगे, शंकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ वाटप झाले. श्री तांबडे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. चार- पाच वर्षांपासून उपक्रम सुरू अाहे. फराळ वाटपानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अानंद फुलला होता. 
 
सोरेगाव वृद्धाश्रमात सदर बझार पोलिसांतर्फे फराळ 
सोरेगावयेथील वृद्धाश्रमात सदर बझार पोलिस ठाण्यातर्फे फराळ वाटप करण्यात अाले. पोलिस अायुक्त महादेव तांबडे, वृद्धाश्रमाचे प्रमुख ब्रिजमोहन फोफलिया, पोलिस निरीक्षक नरसिंग अंुकशकर यांच्या हस्ते फराळ वाटप झाले. मागील तीन वर्षांपासून श्री. अंकुशकर हा उपक्रम राबवितात. 
 
निकाळजे संस्था शांतीसागर संघातर्फे गरजूंना फराळ, कपडे दिले. या वेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, श्रीशैल बनशेट्टी, योगेश कुंदूर, अशोक निंबर्गी, अनिल तालीकोटी, शाम पाटील उपस्थित होते. 
 
संभाजी आरमार 
संभाजीआरमार तर्फे मोदी, अक्कलकोट, जुना पुना नाका, तुळजापूर नाका या स्मशानभूमीमध्ये सेवेकऱ्यांना श्रीकांत डांगे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्यांना फराळ वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी शिवाजी वाघमोडे, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, सागर संगवे, राहुल यमगर, संजय सरवदे, संतोष कदम, प्रवीण मोरे, गणेश ढेरे, संजय मस्के उपस्थित होते. 
पोलिस अायुक्तालयात सफाई कामगारांना फराळ कपडे वाटप करताना पोलिस अायुक्त महादेव तांबडे, सोबत यावेळी नामदेव चव्हाण, अपर्णा गीते, यशवंत केडगे, शंकर जाधव उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...