आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षित तिकीट अर्जावर हवे पूर्ण नाव, रेल्वे मंडळाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी अर्जावर आता पूर्ण नाव लिहावे लागणार आहे. ‘शॉर्टफॉर्म’मध्ये नाव लिहिणाऱ्या प्रवाशांना तिकीट देऊ नका, असा आदेश रेल्वे मंडळाने काढला आहे. हा नियम सर्व विभागांना लागू असून याची सुरुवात पूर्वोत्तर रेल्वे विभागाकडून झाली आहे.

प्रवासी आरक्षण केंद्रावर आल्यानंतर लवकर तिकीट मिळावे म्हणून फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरताना गडबड करतात. पूर्ण नाव लिहिण्याऐवजी नावाच्या शॉर्टफॉर्मचा वापर करतात. तसेच काही प्रवासी जाणून बुजून शॉर्टफॉर्म मध्ये नाव लिहून आरक्षित तिकीट काढतात. त्यामुळे रेल्वे प्रवासात एका व्यक्तीऐवजी दुसरा व्यक्ती सहज प्रवास करू शकायचा. मध्य रेल्वेमध्ये अशा घटना फारशा घडल्या नसल्या तरी दिल्लीच्या भागात मोठ्या प्रमाणात अशा घटना घडलेल्या आहेत.

तिकीट दलांलाकडून याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येतो. नवी दिल्ली आणि मुंबईच्या मार्गावर धावणाऱ्या बहुसंख्य रेल्वे गाडीत नावाच्या शॉर्टफॉर्मचा उल्लेख करून मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. रेल्वे बोर्डने घेतलेला हा निर्णय देशात सर्वच ठिकाणी लागू असणार आहे. सोलापूर रेल्वे विभागास याचा आदेश प्राप्त झाला नाही.

सध्या आरक्षण केंद्रातच लागू
सध्याहा निर्णय रेल्वे आरक्षण केंद्रावरून काढणाऱ्या तिकिटापुरताच मर्यादित असला तरीही लवकरच ई-तिकीट यात्रा तिकीट सुविधा केंद्रावरून काढणाऱ्या तिकिटांसाठीदेखील तो अनिवार्य केला जाणार आहे. यामुळे तिकीट दलांलाना आळा बसेल अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे.

दलालांना चाप बसेल
आरक्षित तिकीट काढताना प्रवाशांनी आपले पूर्ण नाव लिहिणे अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वे मंडळाने दिले आहेत. यामुळे ज्याच्या नावावर तिकीट आहे तोच प्रवासी प्रवास करेल. दलांलाना चाप बसणार आहे. नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई
बातम्या आणखी आहेत...