आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम मैदानावर आजपासून गड्डा यात्रेची उभारणी सुरू, यू-टर्न आणि आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अाम्ही वेगवेगळी अांदोलने केली. मात्र प्रशासन दखल घेत नाही, त्यांच्याकडून उलट चिथावणीखोर भाषाच चालू अाहे. त्याचा निषेध म्हणून सोमवारपासून होम मैदानासह आपत्कालीन मार्गावर गड्डा यात्रेचे स्टाॅल उभारण्यास सुरुवात करणार अाहोत, असे सांगत सिद्धेश्वर देवस्थान पंच समितीने पुन्हा एकदा यू टर्न घेतला अाहे. यापूर्वी यात्राच भरवणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला होता.

मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीजवळ आपत्कालीन मार्गावर चक्री उपोषण सुरू अाहे. त्यावेळी रविवारी काडादी यांनी अापली पुढची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, म्हणावं तसं प्रशासन जागं होत नाही. दीड महिना रस्त्यासह संपूर्ण मैदानावर आमचीच मालकी असताना १०० वर्षांच्या सिटीसर्व्हेच्या उताऱ्यामध्ये ही जागा आमची आहे. प्रशासन आम्हाला आडवे लावत आहे. रस्ता खराब झाल्यावरतो आम्ही दुरुस्त करून देऊ, यासाठी आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री खंदारे पंचकमिटी प्रत्येकी २० लाख घालण्यास समर्थ आहे. तसेच आम्हाला केवळ धर्मादाय आयुक्त जाब विचारू शकतात. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी प्रशासन ऐकत नाही हे चुकीचे आहे. फक्त न्यायालय मुख्यमंत्र्यांकडून गड्डा भरवू नये असे आदेश दिले तर त्याचा मान राखून. प्रशासनाचा निषेध करून सोमवारी गड्डायात्रेच्या कामास सुरुवात होईल, सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समन्वय साधणार
मंदिरसमिती पोलिस यंत्रणेत समन्वय ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यात येईल. मंदिर समितीला काही मार्गाचे पर्याय दिले अाहेत. सोमवारी ते काय भूमिका घेतात पाहू. त्यानंतर पुढील भूमिका ठरवू. - रवींद्र सेनगावकर, पोलिस अायुक्त

दखल घेतली नाही
सिध्देश्वरदेवस्थान समितीने चार दिवसांपूर्वीच सिध्देश्वर यात्रा भरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेतल्याने होम मैदानावर चक्री उपोषण सुरू केले होते. महिलांचा मोर्चाही निघणार अाहे. त्यानंतरही कोणी दाद दिल्याने अाता होम मैदानावर स्टाॅल, पाळणे यात्रेसाठीचे साहित्य उभारण्याचे काम सोमवारपासून सुरू करणार असल्याचे सांगून यात्रा समितीने यू टर्न घेत प्रशासनाला अाव्हान दिले अाहे. तसेच सिद्धेश्वर भक्त नगरसेवकांनी २० जानेवारीच्या पालिका सर्वसाधारण सभेत हे मैदान केवळ दीड महिना नाही तर संपूर्ण वर्षभर आमच्या ताब्यात द्यावे असा ठराव मांडावा, असे अावाहन काडादी यांनी केले.