आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावीचे योगी गजानन आले सोलापूर मुक्कामी, साडेसहाशे वारकऱ्यांच्या सेवेस सोलापूरकर सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘गणगण गणात बोते...’ म्हणत भक्तांच्या भेटीला धावून येणारा शेगावीचा योगी गजानन महाराज शुक्रवारी सोलापूर शहरात मुक्कामी विसावला. सकाळी रूपाभवानी येथील पाणी गिरणी चौकात पालखीचे भक्तिभावात स्वागत झाले. त्यानंतर प्रभाकर महाराज मंदिरात महाप्रसाद घेऊन पालखीने रविवार पेठेतील कुचन प्रशालेत मुक्काम ठोकला. त्यात सहभागी साडेसहाशे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूरच्या भक्तगणांनी मोठी व्यवस्था केली.
११ जूनला शेगावहून निघालेल्या या पालखीने २२ दिवसांचा प्रवास करून शुक्रवारी सकाळी सोलापूर शहर गाठले. शुक्रवारी कुचन प्रशालेतील मुक्कामानंतर शनिवारी सात रस्त्यावरील उपलप मंगल कार्यालयात मुक्काम असणार आहे. रविवारी सकाळी ही पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवेल. त्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी येथील सेवाभावी संस्थांनी जय्यत तयारी केली. कुचन प्रशालेत हरिअोम विणकर बाग बहुउद्देशीय संस्थेने महाप्रसादाची सोय केली. शनिवारी सकाळी नाभिक बांधव वारकऱ्यांची मोफत दाढी आणि कटिंग करणार अाहेत. उपलप मंगल कार्यालयाच्या मुक्काम स्थळी हा कार्यक्रम होईल.

बातम्या आणखी आहेत...