आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दिसतोय बाप्पांचाच फिव्हर, देखावे पाहण्यासाठी होतेय गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गणेशोत्सव म्हणजे सर्वांच्या उत्साहाला आलेले उधाण. हा फिव्हर सध्याला प्रकर्षाने जाणवतही आहे. कारण शहराच्या विविध भागातील गणपती मंडळात सादर होणारे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
बाळीवेस परिसरातील श्री कसबा गणपतीच्या वतीने यंदा सूर्यपुत्र शनिदेव हा चल देखावा केला आहे. तो पाहण्यासाठी सायंकाळी सातनंतर प्रचंड गर्दी पडत आहे. तर रेल्वे लाइन्स भागातील दादा-श्री प्रतिष्ठानने यंदा श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. मंदिर, शिवलिंग नंदी हे याचे विशेष आकर्षण आहे. बाळीवेस परिसरातील श्री आय्या गणपती मंडळाने समाजप्रबाेधनपर देखाव्याचे सादरीकरण केले आहे. सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाने यंदा बाप्पांच्या मूर्तीलाच कैलास पर्वतावर विराजमान झालेल्या जटाधारी शिवशंकराचे रूप दिले आहे. संपूर्ण मंडपात हिमालयाची निर्मिती वाघाचे कातडं पांघरलेला शिव असे या देखाव्याचे स्वरूप आहे. मंडपाच्या समोर जवळपास साडेपाच फूट मोठा सोनेरी नंदी ही ठेवण्यात आला आहे. विशेष विद्युत योजना यामुळे यास रंगत आली आहे. शिंदे चौक गणपती मंडळाने स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार याच्या निषेधार्थ जनजागृती फलक लावून प्रबोधन केले आहे. पूर्व भाग दाजी पेठ येथील गणेशोत्सव मंडळाने बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी गीतावरचा सजीव देखावा केला आहे. पूर्व भाग ताता गणपतीने विशेष सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले अाहे. तसेच शहरातील आजोबा गणपती, पणजोबा गणपती, कसबा गणपती येथेही बाप्पांना पाहण्यासाठी गर्दी आहे.

बातम्या आणखी आहेत...