आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्तींचे दर यंदा स्थिर राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणराया चैतन्य, अानंद आणि उत्साह घेऊन येतो. गणेशोत्सवाला अाणखी महिनाभराचा अवधी असला तरी गणरायाच्या स्वागताची तयारी शहरात दिसून येत आहे. मध्यवर्ती महामंडळासह सार्वजनिक उत्सव मंडळ तसेच गणेश भक्तांनी आतापासून तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. पूर्वभागात गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून यंदा पाऊस नसल्याने गणेशमूर्तीचे दर वाढवणार नसल्याचे संकेत मूर्तिकारांनी दिले आहेत.

रंग, मजुरी, पीआेपी, वाहतूक खर्च यंदा वाढला असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, खंडेराय बाहुबली अशा रुपातील गणराय यंदा भेटीला येणार आहे. परंतु, यंदा पाऊस नाही, दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने दरवाढ करणार नसल्याचेही मूर्तिकार अमर कनकी यांनी सांगितले.

शाडू मूर्तीची किंमत अधिक : पीआेपीची मूर्ती ही मजबूत टिकाऊ राहते. त्यामुळेच आकर्षक नक्षी, कोरीव काम त्यावर करता येते. याउलट मातीची मूर्ती तयार करणे म्हणजे किचकट प्रक्रिया आहे. मातीची मूर्ती करण्यास मोठ्या प्रमाणावर कष्ट लागत असल्याने महाग विकली जाते. जिथे पीआेपीची मूर्ती १५ हजारांत अधिक सुबक मिळते. तिथे मातीच्या मूर्तीची किंमत त्यापेक्षा जास्त जाते. हे मंडळांना परवडणारे नसल्यामुळे ते पीआेपीची मागणी करतात.

राज्यभरात मूर्तीची विक्री : शहरात सुबक गणेशमूर्ती तयार केल्या जातात. त्यामुळे उस्मानाबाद, लातूरसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदीं भागातून येथील मूर्तींना मागणी आहे.
असे आहेत दर : पीआेपीचेप्रतिकिलो दर दहा रुपये आहे, या तुलनेत शाडूचे भाव ३० रुपये प्रतिकिलो आहे, तर मुंब्रा माती ३५ रुपये किलोपर्यंत जाते, असे मूर्तिकार यांचे म्हणणे आहे. परंतु मुंब्रा माती शाडूच्या मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त असल्याने यांना मागणी जास्त आहे.