आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश कुलकर्णी खून खटला, पाचही जणांची निर्दाेष सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘गणेश कुलकर्णी यांचा खून झाला अाहे की अपघात हे सरकार पक्ष न्यायालयात सिद्ध करू शकले नाही, त्यामुळे पाचही जणांना निर्दाेष सोडण्यात येत अाहे’, असा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी सेामवारी दिला. दुपारी बारा वाजता सर्व अाराेपींना पाेलिसांनी न्यायालयात अाणले. त्यानंतर पाचच मिनिटांत निकाल वाचन सुरू झाले.

सव्वाबाराच्या सुमाराला अंतिम निकाल देण्यात अाला. कृषिभूषण गणेश कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योती कुलकर्णी यांना निकालानंतर रडू कोसळले.

संदीप विष्णुपंत पाटील (२७, रा. उपळाई खुर्द), संतोष भगवान कदम (३५, रा. उपळाई), सिद्धेश्वर भारत पाटील (३०, रा. उपळाई), रामलिंग माणिक हराळे (३५, उपळाई), प्रवीण सुनील तांबे (३१, रा. कुंभारी, तुळजापूर) यांना निर्दाेष साेडण्यात अाले.

राजकीय वादाची किनार : माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावात २०१० मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली. गणेश कुलकर्णी व संदीप पाटील यांचे दाेन गट परस्परविराेधी होते. पाटील यांना सहा तर कुलकर्णी यांना पाच जागा मिळाल्या. सरपंच निवडताना गोपनीय मतदान झाले. त्यात पाटील गटाकडून एक मत कुलकर्णी गटाला पडले व पाटील गटाची सत्ता गेली. सिद्धू शिंगाडे हे सरपंच तर गणेश कुलकर्णी उपसरपंच झाले. इथेच वादाची ठिणगी पडली. याच वादातून गणेश यांचा खून झाल्याची तक्रार गणेश यांच्या पत्नी ज्याेती यांनी माढा पाेलिसात दिली हाेती.

भरधाव कारने उडवले
१४ अाॅक्टोबर २०११ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गणेश कुलकर्णी माॅर्निंग वाॅकला जात हाेते. पाठीमागून अालेल्या झायलाे गाडीने त्यांना धडक देऊन चालक फरार झाला हाेता. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष कदम हा अपघातग्रस्त गाडी चालवित होता, तर संदीप पाटील हा बाजूला बसला होता. दत्तात्रय कचरे व महादेव शिंगाडे जेव्हा घटनास्थळी अाले तेव्हा सिद्धेश्वर पाटील याने या दोघांना ‘गणेश यांच्यासारखेच तुम्हाला मारून टाकू’ अशी धमकी दिली हाेती.