आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा डेपाेला आग; ४० बंब पाणी "कचऱ्यात'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हिप्परगा रस्ता परिसरात असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. गुरुवारी दिवसभर अग्निशमन दलाचे ४० बंब आणि महापालिकेचे दोन टॅँकर वापरून आग आटोक्यात आणण्यात आली. धग अजून असून ती संपवण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याचे सहायक आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सांगितले. या कामी सुमारे साडेतीन लाख लिटर पाणी फवारण्यात आले. आगीची माहिती महापालिकेला गुरुवारी सकाळी मिळाली.

आगकचरा वेचणाऱ्यांनी लावली असेल असा अंदाज आहे. कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यास लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. चारही बाजूने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आग लावलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एक आयशर टेम्पो आगीच्या धुरात अडकला होता. त्याला वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दल विभाग प्रमुख केदार अवटे यांनी दिली.

सुमारे ६५ बंब लागले पाणी
अग्निशमन दलाचे चाळीस बंब पाणी वापरण्यात आले. एका बंबमध्ये पाच हजार लिटर पाणी असते. त्यानुसार चाळीस बंबचे दोन लाख लिटर पाणी होते. तसेच महापालिकेच्या १२ हजार लिटर क्षमतेच्या दोन टॅँकरच्या दिवसभर पाच ते सहा खेपा झाल्या. याचे बंबच्या प्रमाणात सुमारे २५ बंब होतात. सुमारे दीड लाख लिटर पाणी होते. एकूण सुमारे साडेतीन लाख लिटर पाणी फवारण्यात आले.