आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garbage Hip Due To Contract Cleanses Staffs Strike

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाने शहरात साचला कचरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विविध मागण्यांसाठी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी लाक्षणिक संप केला. त्यामुळे शहरात कचरा सफाई झाली नाही. सुमारे दोनशे टन कचरा पडून होता.महापालिकेने कंत्राटी सफाई सेवकांची प्रतीक्षा यादी लावावी, त्यांना वेळेवर वेतन अदा करावे, त्यांना रोजंदारी सेवेत घ्यावे या प्रमुख मागण्या आहेत. संपातील कर्मचारी शनिवारी कामावर येणार आहेत, अशी माहिती महापालिका कामगार कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिली. संपकरी कर्मचाऱ्यांनी महापालिका आवारात बैठक घेतली. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांनी त्यांची बैठक घेतली. महापौर प्रा. सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी तोडगा काढण्याचे मान्य केल्याने आठ दिवसांची मुदत देऊन कर्मचारी कामावर परतणार आहेत, अशी माहिती जानराव यांनी दिली.

शहराच्या अनेक भागात घंटागाड्या नियमित येत नसल्याच्या नागरिकांच्या आधीच तक्रारी आहेत. संपामुळे कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या फिरल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पंचायत झाली. मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांनी कचरा उचलला. मात्र, त्यांचे प्रमाण कमी असल्याने शहरातील अनेक भागात कचरा साचल्याचे दिसून आला. शहरात सफाई कर्मचारी संपावर असल्याने किल्ला बागेत मात्र साठलेला कचरा जाळला गेला. कचरा जाळू नये, पर्यावरणास धोका हाेऊ शकतो असे असताना जाळला. तर दुसरीकडे साठलेला कचरा मात्र तसाच पडून होता.
कर्मचाऱ्यांना गाजर दाखवले
काम होत नसताना गाजर दाखवले महापालिका कर्मचारी बदली रोजंदारी काम करत असताना त्यांच्याबाबत मागणी केली. इतर संघटना मागणी करत नाही. मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वर्गणी घेतली जाते. त्या कर्मचाऱ्यांचे काम करता प्रशासनास वेठीस धरत आहेत. कर्मचारी महापालिका प्रशासनास धारेवर धरणाऱ्यांचा निषेध करतो. भारत वडवेराव, अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन
करंगळी धरून येणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये
कामगारांसाठी काम करणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो. आमची करंगळी धरून आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना कायम करा असे म्हणत नाही. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही, त्यांना साहित्य दिले जात नाही ते मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. वाद करण्यापेक्षा कामगारांसाठी काम करणे आवश्यक आहे. अशोक जानराव, अध्यक्ष,महापालिका कामगार संघटना