आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा उचलण्यासाठीचा दर ७६३ वरून २१०० वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरचा समावेश झाला तरी गावठाणसह हद्दवाढ भागातील कचरा उचलण्याचा प्रश्न सुटलेला नाही. कचरा निर्मूलनासाठी महापालिकेने सात वेळा टेंडर प्रसिद्ध केले. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्यांपैकी दोन मक्तेदार पात्र ठरले असून त्यापैकी एक मक्तेदार सोलापूर शहरातील आहे. कचरा उचलण्यासाठी पूर्वीचा प्रतिटन दर ७६३ रुपये होता. आता नवीन दर २३५७ रुपये प्रतिटन सांगण्यात आले. त्यात तडजोड करत २१०० चा दर अंतिम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील इतर शहरांतील दर मनपा आयुक्तांनी मागवले आहेत. त्यासाठी इतर महापालिकांशी पत्रव्यवहार सुरू आहे. ‘दिव्य मराठी’ने इतर शहरातील कचरा उचलण्यासंबंधी माहिती घेतली. कचरा मक्त्याबाबत राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. नाशिकमध्ये १६५० रुपये दर आला अाहे. तेथील टेंडर प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद येथे महापालिकेच्या वतीने कचरा उचलला जातो. मंुबई, पुणे येथील दर दोन हजार रुपयांच्या आसपास आहेत.

सोलापुरात कचऱ्याचा मक्ता पाच वर्षांसाठी काढला आहे. आठ पैकी चार झोनचे दोन टेंडर काढण्यात आले. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट लि. मुंबई आणि यशश्री इन्टरप्रायजेस सोलापूर यांनी मक्ता भरला. ग्लोबल कंपनीने २३०४ रुपयावरून तडजोडी अंती २१०६ रुपये मान्य केले. यशश्रीने २३२० रुपये दर दिला आणि २१०० रुपये मान्य केले. इतर महापालिकांतील दरांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

घरोघरी जाऊन कचरा उचलणे : शहरातीलप्रत्येक घरात जाऊन कचरा उचलण्याची अट आहे. कचरा उचलत असताना ओला, सुका, प्लास्टिक, हाॅटेल कचरा उचलणे आणि वाहतूक करणे यांचा समावेश आहे.

तीनपट वाढ : यापूर्वीसमिक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीने ७५० रुपये दराने दहा वर्षांसाठी मक्ता घेतला होता. नंतर तो दर ७६३ रुपये केला. त्या कंपनीबाबत ओरड झाल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तो मक्ता रद्द केला. पूर्वीपेक्षा तीन पट दर वाढ आहे.

१४ मुद्दे महत्त्वाचे
कचरा संकलन आणि वाहतूक करण्यासाठी मक्तेदारांना १४ मुद्दे देण्यात आले. त्यात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, कचरा वर्गीकरण, संकलन वाहतूक, कर्मचाऱ्यांना साहित्य देणे, शासकीय निमशासकीय कार्यक्रमांच्या वेळी कचरा उचलणे, मृत प्राणी उचलणे, हाॅटेलमधील कचरा उचलणे आदी मुद्दे आहेत. या मुद्द्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची व्यवस्था केली पाहिजे.

प्रश्न सुटणार कधी
महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र कचरा दिसून येत आहे. शाळा महाविद्यालय, सोसायट्या येथील कचरा प्राधान्याने उचला, असे आदेश आयुक्तांनी दिले तरीही कचऱ्याचा प्रश्न अद्याप तरी सुटलेला नाही. दोनच मक्तेदारांनी एक ते चार आणि पाच ते आठ झोनचे टेंडर भरले आहेत. एकात ग्लोबलचे तर दुसऱ्यात यशश्रीचे दर कमी असे दाखवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...