आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागड्या घंटागाड्या खरेदीचा उडणार आता ‘बार’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कचरा व्यवस्थापन खासगीकरण टेंडर प्रक्रियेतील वाद शमतो शमतो तोच कॉम्पॅक्टर खरेदीच्या टंेडर वादाचे फटाके पालिकेत सुप्तावस्थेत वाजू लागले आहेत. कमी किमतीचे टेंडर तांत्रिक कारणावरून नाकारून ५.५८ कोटी रुपयांच्या घंटागाड्यांसह काॅम्पॅक्टर खरेदीचा प्रस्ताव मनपा स्थायी समितीपुढे दिवाळीच्या मुहूर्तावर अाणला अाहे. कचऱ्याचा प्रश्न निकाली काढा अशी मागणी करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली होती. त्यानुसार पुढाकार घेत कचरा खासगीकरणाच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाने गती दिली अाहे.
थर्ड पार्टी अभिप्रायानुसार डब्ल्यूआयटी काॅलेजने प्रतिटन १६०१ रुपये दर दिले. मात्र मक्तेदारांशी वाटाघाटी केली असता, १६९० रुपये दर देण्यास तयार झाले. तो विषय स्थायीकडे पाठवणार, अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. घंटागाड्यांसह काॅम्पॅक्टर गाड्या खरेदी प्रस्तावावर शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

काॅम्पॅक्टरसाठी ५.८० काेटी : कचऱ्यांच्याप्रश्नावर २७ आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेतो, असे महापालिका आयुक्तांनी आमदार शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सांगितले. त्यानुसार निर्णय घेतले. कचरा विभागासाठी १४ व्या वित्त आयोगातून काॅम्पॅक्टर चेसी खरेदीसाठी प्रतिनग १८.३९ लाख, गाड्या खरेदीसाठी २.९० कोटी रुपये. त्याचे बाॅडी बांधण्यासाठी प्रतिनग १६.३८ लाख प्रमाणे २.९० कोटी असे ३४.७७ लाखास एक काॅम्पॅक्टर असे ५.८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

घंटागाड्यासाठी १.७८ कोटी : शहरातीलघरापर्यंत जाऊन कचरा संकलन करण्यासाठी ६० घंटागाड्यांची आवश्यकता असून्, त्यापैकी ३५ नवीन घंटागाड्या खरेदी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीत आहे. एका गाडीसाठी ४.६५ लाख खर्च येईल.

दोनडिलरच्या दरात तफावत मात्र जास्त दराने खरेदी : घंटागाड्यांसाठीटाटा कंपनीच्या गाड्या खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी सोलापुरातीलच चव्हाण मोटर्स यांनी चार प्रकारचे कागदपत्र दिले नाही म्हणून त्यांचा मक्ता उघडण्यात आला नाही. स्टर्लिंग मोटर्सने सर्व कागदपत्र दिले. त्यांचा मक्ता उघडण्यात आला. एका गाडीचे दर ३.७७ लाख रुपये इतके आहे. यापैकी चव्हाण मोटर्सचे दर ४० हजारने कमी होता, अशी माहिती नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली.

दिवाळीत कपड्याचे बाॅक्स, फटाक्याचे प्लास्टिक आणि कागद, किराणा मालाचे कॅरीबॅगसह इतर कचरा तयार होतो. दिवाळीत उत्सव काळात २० ते २५ टक्के कचरा जास्त प्रमाणात तयार होतो. नागरी वसाहतसह बाजारपेठेत कचरा साचल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडे ते कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही.

थर्डपार्टी अभिप्रायानुसार १६०१ रुपये दर आहे. मक्तेदारास वाटाघाटीसाठी बोलवले असता, १६९० रुपये दर त्यांनी मान्य केले. ते स्थायीकडे निर्णयासाठी पाठवण्यात येणार, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली. कचऱ्यांचे खासगीकरण करत असताना मनपाच्या रकमेतून ७.५८ काेटींची वाहने कशासाठी? हा मुद्दा आहे.

^कचऱ्यांचे खासगीकरणटंेडर करार करताना अटी असतील. महापालिकेकडील मनुष्यबळानुसार शक्य त्या प्रभागातील कचरा संकलन करण्यात येईल. गाड्या खरेदी केल्यावर त्या गाड्या आवश्यकतेनुसार मक्तेदारास भाड्याने देता येईल. महापालिका स्वत: काही भागात या वाहनांचा उपयोग करेल. अभिजित हरळे, सहायक आयुक्त
बातम्या आणखी आहेत...