आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gardens Privatize, The Subject Of Municipal Council

बागांचे खासगीकरण, महापालिका सभेत विषय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर - मंडईचे खासगीकरण प्रस्ताव आल्यानंतर त्यापाठोपाठ उद्यान विभागाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव नगर अभियंता कार्यालयाकडून महापालिकेच्या सोमवारच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे. महापालिकेत जकात, कचरा, मंडईनंतर उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विडी घरकुल, आनंदनगर येथील प्रस्तावित बागांसह ३२ उद्याने खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१३उद्यानांसाठी सहा कोटी खर्च
मुख्य१३ उद्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरमधून सुशोभीकरण करण्यात येत आहेत. त्यासाठी सहा कोटींची तरतूद करून मक्ता काढण्यात आल्याने त्याचे काम सुरू आहे. महापालिका उद्यान विभागातील मनुष्यबळ पाहता, देखभाल दुरुस्ती करण्यासाठी अडचण येणार आहे. त्यामुळे खासगीकरणाचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.

काय असेल खासगीकरणात
उद्यानातीलशौचालय, सांस्कृतिक कार्यक्रम िरसेप्शन आदी कार्यक्रमासाठी दर निश्चित करून बाजारभावाप्रमाणे भाडे निश्चित करणे अटी शर्थी घालून उद्यान देणे. संस्थेस, व्यक्ती आणि कंपन्यांत देण्यात येणार आहे.

सभेपुढील विषय
- सातवैद्यकीय अधिका-यांना मुदतवाढ
- बाळे येथे अग्निशामकसाठी भूसंपादन
- पाणीपुरवठा, शुद्धीकरण केंद्रात दिवे
- नेहरूनगर येथे एसटीआरक्षित करणे
- मजरेवाडीत बर्डसेंच्युरीसाठी अहवाल देण्याचा सभासद प्रस्ताव
- उजनी‑सोलापूर समांतर जलवाहिनी

‘एनटीपीसी’नेदिलेल्या अनुदानासह पालिका १२४० कोटींची उजनी ते सोलापूर ही समांतर जलवाहिनी घालण्याचा आराखडा तयार केला आहे. पालिका एनटीपीसी यांच्यातील कराराची माहिती सभागृहापुढे आहे. उजनी धरणातील पाणी आरक्षणासाठी ९२.२८ कोटींचे बंदपत्र सादर करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सभागृहापुढे ठेवला आहे.