आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारमेंट प्रदर्शनाला पाच हजार व्यापाऱ्यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देशात पहिल्यांदाच सोलापूरमध्ये भरलेल्या गणवेश आणि गारमेंट प्रदर्शनाला देश आणि विदेशातील सुमारे पाच हजार व्यापाऱ्यांनी भेटी दिल्या. येथील उत्पादनांचे कौतुक झाले. साधारण १७० नवे व्यापारी करार झाले. नवा ग्राहक मिळाल्याने उत्पादक अानंदी झाले. आता उद्योगाचा विस्तार करण्यासाठी ‘गारमेंट पार्क’च्या भूमिपूजनाकडे लक्ष लागले आहे. 
होटगी रस्त्यावरील हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियममध्ये भरलेले हे प्रदर्शन शनिवारी संपले. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात ८२ स्टॉल्स होते. पुण्या-मुंबईतून आलेल्या अनेकांनी गणवेशाचे नमुने, त्याची छायाचित्रे नेली. काॅर्पोरेट कंपन्यांनीही अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाची निवड केली. या सर्व घडामोडींनी उत्पादक एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू यांनी दिली. 

यंत्रमागधारकही गारमेंट उद्योगात येण्याचे संकेत 
^प्रदर्शनाने भल्याभल्यांनाचकित केले आहे. काही यंत्रमागधारकांनी गारमेंट उद्योगात येण्याची इच्छा व्यक्त केली. गारमेंट उत्पादकांना नवे व्यापारी मिळाले. काहीनी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला. हा उद्योग वाढला तर रोजगार वाढणार आहे. रामवल्लभजाजू, अध्यक्ष, सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ 
 
१. प्रत्येकाकडे नवा ग्राहक :प्रदर्शनातील तीन दिवस प्रत्येक उत्पादकाकडे नव्या ग्राहकांची रेलचेल होती. वस्त्रांची निवड, रंग-संगती, त्यातील नावीन्यता याबाबत चर्चा झाली. नवीन आेळखी झाल्या. मागणी नोंदवल्या. त्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरला. 
२. विस्ताराचीनवी संधी :उत्पादकांकडे नवी मागणी नोंदली गेली. त्याला वेळेची मर्यादा अाहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात मनुष्यबळ वाढेल. तो तात्पुरत्या स्वरूपातील असला तरी भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 
 
आता पुढे काय..? 
पुणे, मुंबई, हैदराबादसह परदेशी व्यापाऱ्यांची प्रदर्शनाला भेट, मिळाला नवीन ग्राहक, झाले १७० व्यापारी करार 
३. गारमेंटपार्कची प्रतीक्षा : नरसिंगगिरजी गिरणीच्या जागेवर २६ जानेवारीला गारमेंट पार्कचे भूमिपूजन करण्याची घोषणा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तर हा कार्यक्रम पुढे जाणार आहे. 
४. एकलाख रोजगार : विडीआणि यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने यातील रोजगार गारमेंटकडे वळण्याची शक्यता आहे. गारमेंट पार्क आणि इतर छोटे युनिट वाढले तर पुढील पाच वर्षांत एक लाख लोकांना रोजगार मिळेल, असा अंदाज आहे.