सोलापूर - नरसिंग गिरजी कापड गिरणीची जागा गारमेंट पार्कसाठी योग्यच आहे. परंतु ही जागा उत्पादकांना कशी देणार, त्याचे दर काय असतील, इतर सुविधा काय असणार आहेत, या बाबी पाहूनच त्यात उत्पादक सहभागी होतील, असे येथील गारमेंट उद्योजकांनी सांगितले अाहे. एमआयडीसीच्या धर्तीवर सुविधा मिळवून दिल्या तरच हे पार्क साकारणे शक्य होईल, असेही त्यांना वाटते.
भय्या चौकातील गिरणीच्या निम्म्या जागेवर गारमेंट पार्क उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला. वस्त्रोद्योग खात्याचे अतिरिक्त सचिव सुनील पोरवाल यांना प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेशही दिले. या जागेवर ब्रिटिशकालीन इमारती आहेत. मूलभूत सुविधाही आहेत. त्याचे अद्ययावतीकरण केले तर अतिशय उत्तम पार्क या जागेत होईल.
असे असेल पार्क
शहराच्या मोक्याच्या ठिकाणी आहे साडेसतरा एकर जमीन
या ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारती, रस्ते, गोदामे अन् संरक्षित भिंत
परिसरातील कामगारांच्या चाळीत कुशल मनुष्यबळ
वाहतुकीसाठी वेगळी व्यवस्था करण्याची काही गरजच नाही
गारमेंट उद्योजक महेश बाकळे म्हणतात...
नरसिंग गिरजी कापड गिरणीची जागा गारमेंट पार्कसाठी योग्य अाहे? शहराच्यामोक्याच्या ठिकाणी असल्याने अतिशय उत्तम.
काहीअडचणी येण्याची शक्यता आहे? कुशलमनुष्यबळ मिळणार नाही. त्याची काळजी वाटते.
चाळीतल्याकामगार, महिलांना प्रशिक्षण दिले तर.. हाे,हा उपाय आहे. पण, त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र हवे.
सर्वचउत्पादक यात सहभागी होतील? जागाकुठल्या दराने आणि कसे देणार यावर ते अवलंबून आहे.
जागांचेवाटप कसे व्हावे, असे आपल्याला वाटते? एमआयडीसीच्याजागांचे वाटप व्हावे, तशा सुविधाही द्याव्यात
उत्पादकांना आणखी काय सवलती अपेक्षित आहेत? मोदींनी‘स्टार्टअप् इंडिया’ सांगितली. ती दिली तरी पुष्कळ आहे.