आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात क्लोरीन वायू गळती, महिलेचा मृत्‍यू, 30 जणांची प्रकृती बिघडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- येथील शिवाजी उद्यम नगरमध्‍ये असलेल्‍या एस.एस. एंटरप्राइजेस या वेल्डिंग व किरकोळ मशीन जॉब दुरुस्ती करून देणाऱ्या कारखान्यात आज, मंगळवारी दुपारी अचानक वायू गळती झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

अशी घडली घटना
वेल्डिंग करण्‍यासाठी लागणा-या क्‍लोरिन सिलिंडरचा नट खोलत असताना अचानक तो तुटला व त्‍यामुळे परिसरात सर्वत्र पिवळ्या रंगाचा वायू पसरला. हा वायू सुमारे 200 फुट उंच पसरला. या वायूच्या संपर्कात अधिक काळ आल्‍याने अनेक जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. लक्ष्मीबाई पांडुरंग माने या 68 वर्षीय महिला या घटनेत गंभीर होत्‍या. उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला.

अनेकांची प्रकृती गंभीर
या वायू गळतीनंतर परिसरातील सुमारे 30 जण वायूच्‍या संपर्कात आले. त्‍यामुळे त्‍यांचीही प्रकृती खालावली असून त्‍यांना त्‍वरीत हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्‍याचे सांगण्‍यात येते. वायू गळतीच्‍या वेळी रस्त्यावरून जाणारे काही वाहनचालकही अपघातग्रस्त झाले आहेत.
चक्‍कर व उलट्यांचा होतो त्रास
या विषारी वायूच्‍या संपर्कात आल्‍यानंतर उलट्या व चक्‍कर येणे असा त्रास सुरू होतो. ही घटना घडल्‍यानंतर अग्निशमन दल व परिसरातील नागरिकांनी घटनास्‍थळी मदत कार्य सुरू केले. लक्ष्मीबाई यांना वाचवण्याच्‍या प्रयत्नात निखिल सुरेश गायकवाड आणि कपिल मुदगल या दोघांचीही प्रकृती बिघडली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..