आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार, दारू विकाल तर, बांगड्या भरू : सरपंच गायत्री शिरसकर यांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपळवाटे(ता. माढा) ग्रामपंचायतीच्या पहिल्याच ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला. तर यापुढे गावात कोणी दारूविक्री केल्यास त्याची बांगड्या भरून गावातून वरात काढू, असा इशारा सरपंच गायत्री शिरसकर यांनी दिला.

उपळवाटे येथे अवैध दारूविक्री होते. शाळा शासकीय कार्यालयांच्या परिसरात दारूविक्री व्हायची. त्याचा शाळकरी मुलांसह शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा. त्यामुळे दारूबंदी करण्याची मागणी होती. महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूक पदाधिकारी निवडीनंतर पहिली ग्रामसभा झाली. यात दारूबंदीचा ठराव करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य विद्या दीपक खुपसे यांनी ही सूचना मांडली. त्याला ग्रामपंचायत सदस्य वर्षाराणी खुपसे यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेनेही या ठरावाला मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गायत्री शिरसकर होत्या. या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...