आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपत्रित अधिकाऱ्यांचा "पगारात भागवा'चा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्यान्याय्य मागण्यांसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. याच वेळी भ्रष्टाचारामुळे मलिन होत असलेली प्रतिमा सावरण्यासाठी, स्वाभिमान जपण्यासाठी "पगारात भागवा' अभियानही गांभीर्याने राबवण्याचा निर्धार करण्यात आला.
अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी त्यासंबंधी शासनाशी चर्चा व्हावी, यासाठी २९ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर दुपारच्या सत्रात लक्षवेध आंदोलन करण्यात येणार असल्याची महिती समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्राप्रमाणे दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, जानेवारी २०१५ पासून टक्के महागाई भत्ता वाढ करावा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० रुपये ग्रेड पेची मर्यादा काढावी, महिला अधिकारी-कर्मचारी यांना वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी, प्रशंसनीय कामाबद्दल जानेवारी २००६ पासून आगाऊ वेतनवाढ रोखावी, मानीव निलंबन कार्यपद्धती बंद करावी, मॅट यंत्रणा रद्द करू नये, रिक्त असलेली दीड लाख पदे भरावीत, सातवा वेतन आयोग येण्यापूर्वी वेतन त्रुटी दूर कराव्यात, अधिकाऱ्यांच्या पाल्यांची अनुकंपा तत्त्वावर नेमणूक करावी, कल्याण केंद्रासाठी मंजूर झालेला १० कोटी निधी लवकर उपलब्ध करावा आदी मागण्यांसाठी लक्षवेध आंदोलन करण्यात येणार आहेत, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.

महासंघासाठीदु:खदायक अन् क्लेशकारक बाब
महासंघानेप्रसिद्ध केलेल्या निवेदनात आजच्या अधिकारी कर्मचारी यांच्याविषयी गंभीर निवेदन केले. कोणत्या ना कोणत्या विभागात अधिकारी, कर्मचारी यांना रंगेहाथ पकडल्याचे वृत्त कानी पडते. अशा प्रकारे आपल्या अधिकारी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडणे, महासंघासाठी दु:खदायक क्लेशकारक आहे. ही प्रतिमा महासंघाच्या प्रतिमेस काळवंडणारी आहे. यामुळे महासंघाने जे अधिकारी-कर्मचारी अनुचित आचरण व्यवहार करताना सापडतील, त्यांच्यावर जलद न्यायालयात खटले दाखल करावेत, भ्रष्टाचार सिद्ध झालेल्यांना निर्दोष ठरवण्यासाठी महासंघाच्यावा संघटनेच्या वतीने कोणतेही निवेदन दिले जाणार नाही, अशा अधिकाऱ्यांना संघटनेमध्ये पदाधिकारी वा सदस्य म्हणून स्वीकारले जाणार नाही.

काही अधिकाऱ्यांमुळे सर्वांचीच होते बदनामी
राजपत्रितअधिकारी महासंघाने सेवेतील काही लोकांमुळे संपूर्ण अधिकारी-कर्मचारी यांची होणारी बदनामी टाळण्यासाठी पगारात भागवा हे अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे महासंघाचे उपाध्यक्ष विनायक लहाडे यांनी सांगितले. काहीतरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही, अशी जनतेची धारणा झाली आहे. ही धारणा दूर करण्यासाठी पगारात भागवा अभियान सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी-कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे लहाडे यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...