आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य रेल्वे तिकिटांची मुदत आता तीन तासांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेच्या सामान्य दर्जाचे तिकीट काढल्यानंतर त्या तिकिटावर तीन तासांच्या आत प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला असून मार्चपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तिकीट काढल्यानंतर तीन तासात जर प्रवास झाला नाही तर ते अवैध तिकीट समजून संबंधित प्रवाशांवर विना तिकीट प्रवास करत असल्याचे गृहित धरून कारवाई केली जाणार आहे. पूर्वी सामान्य तिकीट काढल्यानंतर १२ तासांच्या आत प्रवास केला जाऊ शकत होता. ती मर्यादा कमी करून तीन तासांवर आणली आहे.

प्रवाशाची पहिली गाडी सुटल्यानंतर जास्तीत जास्त तासांपर्यंत त्या तिकिटाच्या आधारावर दुसऱ्या गाडीचा प्रवास करता येऊ शकेल. तासांपेक्षा अधिक वेळ झाला असेल तर ते तिकीट ग्राह्य धरले जाणार नाही. हा नियम १९९ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. त्याच्या पुढे प्रवास असेल तर हा नियम लागू केला जाणार नाही. सामान्य तिकिटांच्या गैरवापरामुळे रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

सामान्य तिकिटाच्या गैरवापराची काही उदाहरणे रेल्वे बोर्डासमोर आली. त्यामुळे बोर्डाने याच्या वापराच्या मर्यादेवर बंधने आणली. सामान्य तिकीट तासांपर्यंत चालणार आहे. मार्चपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांना लवकरच याचे आदेश देण्यात येईल. के. जयशंकर, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई