आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरस्वतीची पूजा करा लक्ष्मी पाठीशी राहील - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हायकोर्टात एम. ए. राणे यांच्याकडे वकिली करताना त्यांनी घटनेकडे समर्थपणे बघायचं कसं हे शिकवलं. सुप्रीम कोर्टात अॅड. स्वराजी यांच्याकडे दुसरी इनिंग सुरू करताना त्यांनी घटना कशी मांडायची हे शिकवले. संघर्ष केला. अभ्यासातून शिकत गेलो. समोरची व्यक्ती अापल्यापेक्षा हुशार अाहे, ही भावना मनात ठेवली. त्यामुळे काही चांगले काम करता अाले, असा कृतार्थ भाव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांनी व्यक्त केला.
नवोदित वकिलांनी सुरुवातीला लक्ष्मीची पूजा करण्यापेक्षा सरस्वतीची उपासना करावी. लक्ष्मी अापोअाप पाठीशी राहील, असा सल्ला श्री. लळीत यांनी दिला. रविवारी सोलापूर बारतर्फे हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचा सत्कार सोहळा झाला.

अशिलाची बाजू न्यायालयात मांडताना न्यायाधीशांच्या नजेरत बाजू भरण्यासाठी वकील धडपडत असतो. शेवटी वकील व्यवसाय म्हणजे ९० टक्के भाग्य असते. पाच टक्के न्यायाधीशांचे वैयक्तिक मत अथवा तत्त्वज्ञान असते. पाच टक्के वकिलांचे योगदान असते. त्यातही दोन टक्के वकील कष्टाळू असतात. तीन टक्के संथपणे काम करतात.

सुरुवातीला दहा युनिटपणे काम करा एक पैसा मिळेल. काही कालावधीनंतर दहा युनिटला दहा पैसे मिळतात. लोणचे मुरल्यानंतर जी चव येते, तशी कामाची गुणवत्ता वाढली की, अापलीही गुणवत्ता वाढते. यामुळे झोकून देऊन काम करा, सदैव प्रयत्न करा. मोठे होण्यासाठी व्हीजन ठेवा. म्हणूनच वकिलांचा तारुण्याकाळ पैलवानांचा वृध्दापकाळ हा कसोटीचा काळ असतो.

न्यायाधीश मुख्य पुजारी, तर वकील सहपुजारी
न्यायाधीशन्यायमंदिरातील मुख्य पुजारी असतो. वकील हे सहपुजारी. मंदिरात देवाची पूजा करताना मुख्य पुजाऱ्याकडे पान, फुले, पूजा साहित्य सहपुजारी देतात. ती देवाला समर्पित केली जातात. तसे वकिलांनी अशिलांची बाजू मांडताना पुरावे, महत्त्वाची कागदपत्रे, समर्थपणे बाजू मांडावी. सुरुवातीलाच अापण अभ्यासपूर्ण बाजू मांडण्याचा प्रयत्न करा. त्याच अाधारे न्यायाधीश निकाल देतात. अापल्यातील शक्ती जागवा, ती पुढे येऊ द्या.
बातम्या आणखी आहेत...