आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे अामिष दाखवून प्रेमसंबंध; त्रासाला कंटाळून युवतीने संपवले जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. अाई मुंबईत केअरटेकर म्हणून कामाला. अाजीकडे एक बहीण भावासोबत राहत होती. गल्लीतीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे अामिष दाखवून लग्न करता मानसिक त्रास दिल्यामुळे तरुणीने घरी गळफास घेऊन अात्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार एनजी मिल चाळ, मुरारजी पेठ येथे घडला अाहे. प्रीती दत्तात्रय कदरकर (वय २२, रा. एनजी मिल चाळ, सोलापूर) असे मृत तरुणीचे नाव अाहे. 
 
शैलेश ऊर्फ बाॅबी शामराव खुळे (वय ३२, रा. एनजी मिल चाळ, सोलापूर) याला अटक झाली अाहे. तरुणीची अाई वैशाली दत्तात्रय कदरकर (रा. ग्रॅण्ट रोड, मुंबई, मूळ गाव सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. वैशाली या मुंबईत राहतात. एका घरात त्या ज्येष्ठ महिलेची काळजी घेण्यासाठी केअरटेकर म्हणून काम करतात. दोन मुली एक मुलगा सोलापुरात अाजीकडे राहतात. मृत प्रीती या एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या. काॅलनीत राहणाऱ्या खुळे या तरुणासोबत काही महिन्यापासून तिचे प्रेमसंबंध जुळले. लग्नाचा तगादा लावल्यानंतर तो लग्न करता मानसिक शारीरिक त्रास देत होता. सोमवारी रात्री प्रीतीने घरी गळफास घेऊन अात्महत्या केली. या घटनेला खुळे हाच जबाबदार अाहे म्हणून अाईने तक्रार दिली अाहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी यांना विचारले असता, दोघांमध्ये काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे अामिष दाखवत होता. पण, लग्न काही करून घेतला नाही. संशयित खुळेला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...