आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील २० पेठांमध्ये तब्बल १४ हजार मिळकती नोंदीविना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेकडे नोंद नसलेल्या मिळकतीचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने सायबर टेक कंपनीच्या सहकार्याने शहरात जीआयएस सर्व्हे करण्यात येत आहे. ५२ पैकी २० पेठांचे काम पूर्ण झाले तर १५ पेठांचे काम सुरू आहे. २० पेठेत ६७ हजार ७७३ मिळकती तपासल्या. त्यापैकी मनपाकडे नोंद नसलेल्या १४ हजार ३२ मिळकती असल्याचे तपासणीत दिसून आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.
नोंदनसलेल्या मिळकती कंसात मनपाकडे नोंद नसलेले : बाळे२३५० (१२११७), बेगम पेठ ७५ (४५९), भवानी पेठ ३२४० (५१५७), सिव्हिल लाइन १००९ (१३८१), दक्षिण सदर बझार १४४४ (२०८४), गणेश पेठ १४ (११७), गोल्ड फिंच पेठ २२६ (४२२), गुरुवार पेठ ३५ (२१२), होटगी रोड ६६४ (९१९), जोडभावी पेठ ४१८ (१२७५), मोदी १४३ (१८८), मुरारजी पेठ ११०५ (२६२२), उत्तर कसबा ३२४ (१४३६), पश्चिम मंगळवार पेठ ४७२ (११७०), पूर्व मंगळवार पेठ २७५ (४५६), रविवार पेठ ०० (१०), साखर पेठ २१३ (१०३०), शनिवार पेठ ५५ (४४५), शुक्रवार पेठ १४४ (९४७), सिद्धेश्वर पेठ १००० (८१३), सोमवार पेठ ११० (१३७), सोरेगाव ६२ (८७७), दक्षिण कसबा ३३४ (९१२), उत्तर सदर बझार ३१९ (२८४), विजापूर रोड (१७६).

विकासकांना बिल : काही इमारती बांधून तसेच ठेवल्या आहेत. त्या इमारतीची करआकारणी करण्यात येणार आहे. त्याचे बिल विकासकांना देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. यावेळी मनपा संगणक विभागाचे सचिन कांबळे उपस्थित होते.

२० पेठांत १४ हजार विनानोंद मिळकती
२० पेठांतील ६७ हजार मिळकती तपासल्या. त्यात १४ हजार ३७ मिळकती भाड्याच्या आहेत तर १४ हजार ३२ मिळकती मनपाकडे नोंद नसलेल्या आहेत. त्यात सर्वाधिक मिळकती भवानी पेठेतील ३२४० मिळकती आहेत. याशिवाय बाळे, सिव्हिल लाइन, दक्षिण सदर बझार, मुरारजी पेठ, सिद्धेेश्वर पेठ या परिसरात हजारपेक्षा जास्त मिळकती नोंद नसलेल्या आहेत.
सहाय्यक आयुक्तांची नेमणूक
जीआयएससर्व्हे केलेला डाटा प्रमाणित करण्यासाठी नागरिकांकडून सूचना हरकती मागवण्यात येणार आहे. त्यानंतर २१ दिवसांनी त्याचे प्रमाणित करून पुढील प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी सहाय्यक आयुक्त अभिजित हरळे यांची नियुक्ती केली.

एकूण संख्या
९८३: खुले प्लाॅट
३६५१९ : मिश्र
९०९६ : रहिवास
४१३९ : वाणिज्य

: उद्योग
५०७३९ : एकूण मिळकती
१४०३७ : भाड्याच्या मिळकती
१४०३२ : नोंद नसलेल्या मिळकती
पेठांचा काही भाग : काहीपेठातील संपूर्ण मिळकती आल्या नाहीत. अन्य भाग पुढील सर्व्हेत असेल.

३१ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हे पूर्ण अन्यथा काळ्यात यादीत
जीआयएसचे काम सायबर टेक कंपनी ठाणे यांना देण्यात आले. सुरुवातीला त्यांना देण्यात आलेला दीड वर्षाचा कार्यकाळ संपला. त्यावेळेत त्यांनी काम पूर्ण केले नाही. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली. ५२ पेठांपैकी २० पेठांचे काम केले. अन्य ३२ पेठांचे काम अपूर्ण आहे. हे काम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करावे अन्यथा कंपनीस काळ्या यादीत घालून त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, बिल अदा केले जाणार नाही, असे आयुक्त काळम-पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...