आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेसाठी वाळवंटात एक दिवस वाढवून द्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - कार्तिकी व चैत्री यात्रेसाठी भाविकांना चंद्रभागा नदीचे वाळवंट वापरण्यासाठी आणखी एक दिवसाचा कालावधी वाढवून देण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यात्रांच्या कालावधीत वाळवंट वापरण्याविषयीच्या नियोजनासाठी तेली यांनी रविवारी (दि. १८) वारकरी- फडकरी यांच्यासमवेत बैठक घेतली.

उच्च न्यायालयाने वर्षातून फक्त २० दिवस वारकऱ्यांना नदीपात्राचे वाळवंट वापरण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार कार्तिकी वारीसाठी शुद्ध नवमी ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत सात दिवस, माघी वारीसाठी शुद्ध नवमी ते शुद्ध त्रयोदशीपर्यंत पाच दिवस, चैत्री वारीसाठी शुद्ध दशमी ते शुद्ध द्वादशीपर्यंत चार दिवस आणि आषाढीवारीसाठी शुद्ध दशमी ते शुद्ध द्वादशीपर्यंत तीन दिवस व कार्तिकी व चैत्री वारीतील एक दिवस अशा एकूण २० दिवसांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र, कार्तिक वारीत आणखी एक दिवस भाविकांसाठी वाढीव सवलत मिळावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर तेलींनी प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.