आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Prority To Make In Solapur Collector Mundhe

'मेक इन सोलापूर'ला प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी मुंढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील उद्योगजगताला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी येथील उद्योजकांनी, लघुउद्योजकांनी प्रयत्न करायला हवेत, पंतप्रधानांच्या स्वप्नातील मेक इन इंडिया मुख्यमंत्री महोदयांच्या नजरेतील मेक इन महाराष्ट्रला सार्थ ठरवित असतानाच येथील उद्योजकांनी मेक इन सोलापूरला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुनिलकुमार रेलन, अग्रणी बँकेचे श्रीनिवास पत्की, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, विदर्भ कोकण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक ए.पी. बनसोडे आदी उपस्थित होते.
मुद्रा योजनेची शिशु, किशोर तरुण गट अशी विभागणी केली आहे. यासंबंधी दि. २५ सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अशी माहिती व्यवस्थाक पत्की यांनी दिली.