आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी. ई. सिव्हिलसाठी सुवर्णपदक, सोलापूर विद्यापीठातील एकूण सुवर्णपदकांची संख्या २९ झाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठ आता बी. ई. सिव्हिल या विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सुवर्णपदकाने सन्मानित करणार आहे. निवृत्ती व्होनप्पा गायकवाड (स्वकूळसाळी) सुवर्णपदक प्रत्येक वर्षी देण्यात येण्यासाठी दिलेली एक लाख रुपयांची देणगी विद्यापीठाने स्वीकारली. यामुळे आता सुवर्णपदकांच्या संख्येत आणखी एकने वाढ होऊन ती २९ इतकी झाली आहेत.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच ८५ वी बैठक कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तीत या विषयाला मान्यता देण्यात आली. कुलसचिव शिवशरण माळी यांनी बैठकीचे सचिव म्हणून कामकाज पाहिले. आगामी दीक्षांत समारंभापासून देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्राचे सुधारित फॉरमॅटला मंजुरी मिळाली. आता पदवी प्रमाणपत्रामध्ये विद्यापीठाच्या नॅकने केलेल्या मुल्यनिर्धारणाचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच डी बारकोड वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ती अधिक सुरक्षित होतील. नवीन फॉन्ट वापरला जाणार आहे. ही प्रमाणपत्रे आकारात, आकर्षक सुबक असतील. या प्रमाणपत्रावरील डी बारकोड कॅमेराद्वारे स्मार्ट फोनवरून स्कॅन केल्यास विद्यार्थ्याला आपले प्रमाणपत्र त्याच्या स्मार्ट फोनवर पाहता येईल.