आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या दरात कमालीची घसरगुंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रीसदेशाची दिवा ळखोरी आणि चीनच्या बाजारपेठेतील घबराटीमुळे सोन्याच्या दरात कमालीची घसरगुंडी सुरू झाली. गेल्या आठवड्यात २७ हजार रुपयांना (१० ग्रॅम) विकले गेलेल्या सोन्याचा दर बुधवारी २६ हजार २०० रुपये होता. गुरुवारी त्यात २०० रुपयांची वाढ झाली. यात आणखी वाढ होईल, असे व्यापाऱ्यांना वाटत नाही. दरात आणखी घसरण होईल, असाच त्यांचा अंदाज आहे.

ग्रीस आणि चीनमधल्या घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगतात. २०१४ मध्ये ११ एप्रिलला सोन्याच्या दराने सर्वात नीचांकी (२५ हजार ६००) नोंद केली. त्या दिवशी गुरुपुष्यामृत होते. अचानक झालेल्या घसरणीमुळे छोटे सराफ व्यापारी घाबरून गेले होते. त्यावेळी हा दर २५ हजारांपर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु तसे झाले नाही. दुसऱ्याच दिवसापासून त्याच्या वाढीचा आलेख उंचावत गेला. साधारण २८ हजारांपर्यंत जाऊन स्थिर झाला. त्यानंतर वर्षभरात २७ हजारांच्या आसपास या दरात चढ-उतार झाली.

आंतरराष्ट्रीय घडामोडी
सोन्याच्या दरातील घसरणीला आंतरराष्ट्रीय घडामोडी जबाबदार आहेत. ग्रीसने दिवाळखोरी जाहीर केली. त्यानंतर बुधवारी चीनचा बाजारच उठला. त्यामुळे देशाच्या बाजारपेठेवर परिणाम झाला. त्याचा थेट परिणाम म्हणजे सोन्याच्या दरात झालेली घसरण होय. प्रदीपभोळा, सराफ व्यापारी

या वर्षातील सर्वात नीचांकी घसरण
ग्रीसआणि चीनच्या घडामोडींचे निमित्त झाले. या वर्षातील सर्वात नीचांकी सोन्याची नोंद बुधवारी (ता. ८) झाली. रमजाननिमित्त सध्या सुवर्णपेढ्यांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येते. अधिक महिना असल्याने जावयांना जेवण देऊन चांदीच्या वस्तू देण्याची प्रथा आहे. त्यासाठीही सराफ बाजारात गर्दी आहे. अशा वातावरणात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.