आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने दरात १५०० रुपयांनी झाली वाढ, दर कमी असतानाही ग्राहक नव्हता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या महिन्यात २५ हजार रुपये दहा ग्रॅम (तोळा) विकले गेलेल्या २४ कॅरेट सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली. दर कमी असतानाही ग्राहकांचा थंडा प्रतिसाद होता. आता लग्नसराई तोंडावर असतानाही बाजारपेठ थंडच असल्याचे व्यापारी सांगतात.
गेल्या वर्षी झालेल्या दसरा, दिवाळीतही दर स्थिर होते. मुहूर्तावरची खरेदी सोडली तर बाजारपेठांमध्ये सोन्याला जादा मागणी नाही. दिवाळीनंतरही सोन्याच्या दराचा अालेख उतरताच राहिला होता. ग्राहक आणखी कमी होईल, अशा अपेक्षा बाळगून होते.

दर २६ हजार ६०० रुपये
गुरुवारी२४ कॅरेट साेन्याचे दर २६ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्रॅम होते. शुक्रवारी मात्र त्यात २०० रुपयांची घसरण झाली. एकच दिवसात २०० रुपये कमी झाले. शुक्रवारी असलेला २६ हजार ६०० रुपये दर स्थिर राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

चिनी परिणाम
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचीनने मोठ्या प्रमाणात सोने विक्रीस काढले आहे. त्यामुळेच सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली. दर वाढण्याचे कारण म्हणजे भांडवली बाजारातील घसरण. या घडामोडींशी ग्राहकांचा थेट संबंध नसतो. थोड्याशा प्रमाणात वाढले काय किंवा कमी झाले काय? सोन्याला मागणी असतेच. परंतु ती अपेक्षित दिसत नाही. गिरीश देवरमनी, अध्यक्ष,सराफ व्यापारी असोसिएशन