आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लख लख उजळल्या सुवर्णपेढ्या, सोने खरेदीसाठी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दीपावलीम्हणजे प्रकाशाचा सण... धनत्रयोदशीला लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला... खरेदीच्या लगबगीने सुवर्णपेढ्याही लकाकून गेल्या... शुक्रवारी सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडला...
वसुबारसेला लक्ष्मीच्या पावलांनी दिवाळी आली. धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी झाली. रविवारच्या अमावास्येला महालक्ष्मीच्या पूजनाची तयारी केली. लक्ष्मीची पूजा म्हणजेच धनाची पूजा. कुबेराची पूजा म्हणजे ऐश्वर्याची पूजा असते. त्यासाठी धनलक्ष्मीच्या प्रतिमा असणाऱ्या सोने-चांदीच्या नाणी खरेदीस ग्राहकांनी पसंत दिली.

शुक्रवारी सोन्याचा दर ३० हजार ५०० होता. धनत्रयोदशीला सोने घेणे शुभ मानले जाते. त्यासाठी सराफपेढ्यांमध्ये सोन्याच्या नाणी, वळी, दागिने उपलब्ध होते. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजार, पु. ना. गाडगीळ, वामन हरी पेठे यांसारख्या मोठ्या पेढ्या अशोक चौक, बुधवार बाजार येथील छोट्या सराफ पेढ्यांमध्येही गर्दी होती.

धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी सोने खरेदीसाठी शहरातील सुवर्णपेढ्या ग्राहकांनी अशा फुलून गेल्या होत्या.

^महालक्ष्मीच्या पूजनासाठीसोन्याच्या नाण्यांना ग्राहकांची मोठी मागणी होती. चांदीचे नाणेही घेतले गेले. पाडव्याला दागिन्यांची खरेदी होईल. गत वर्षीच्या तुलनेत यंदाची दिवाळी खूप छान झाली.'' अविनाशकानडे, व्यवस्थापक, वामन हरी पेठे

पावसाने ग्रामीण ग्राहक सुखावला, खरी दिवाळी
गेल्याकाही वर्षांपासून दिवाळीत खरेदीचा उत्साह नव्हता. त्याचे मुख्य कारण दुष्काळ. सराफ बाजारात ग्रामीण भागातील ग्राहक आलाच नाही. त्यामुळे अपेक्षित व्यवसाय झाला नसल्याची खंत व्यापारी करायचे. यंदा मात्र सराफ व्यापारी आनंदी दिसले. दसऱ्यानंतर दिवाळीतही सोने खरेदीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. त्याचे कारण पाऊस चांगला झाला. ग्रामीण ग्राहक सुखावल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...