आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळीकडून तब्बल ८० तोळे सोने, २३ तोळे चांदीचे दागिने हस्तगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लक्ष विचलित करून एकट्या-दुकट्या महिलांना लुबाडणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून ८० तोळे सोने आणि २३ तोळे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. बाजारभावाप्रमाणे याची किंमत सुमारे २० लाख रुपये होते. या टोळीतील चौघांना अटक झाली. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. 
 
रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी महिलांनी लक्ष विचलित करून जवळील कॅरी बॅगमधील सात ग्रॅमची बोरमाळ, आठ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र चोरून नेल्याची फिर्याद गीता सोमनाथ बळे (रा. संगम बंगलो, मुळेगाव रोड) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत जून रोजी दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलस उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. 

या तपासात दोन महिलांची नावे निष्पन्न झाली. अनिता बलभीम गायकवाड (वय ४०, रा. धोेंडिबा वस्ती), रेखा लक्ष्मण गायकवाड (वय ५०, रा. सोनीनगर) यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यांना ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी कबुली दिली. हा गुन्हा गणेश विलास जाधव, संजय ऊर्फ कालू मनोहर जाधव, अर्चना संजय जाधव, महादेवी गायकवाड यांच्यासह संगनमताने केल्याचेही सांगितले. त्याच दिवशी आरोपी गणेश विलास जाधव (वय २५, रा. भूषण नगर) कालू मनोहर जाधव (वय ३९) यांनाही अटक करण्यात आली. 
आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असून, इतर गुन्ह्यांबाबत इतर फरार आरोपींबाबतचा तपास सुरू आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पथकाने उत्कृष्ट कामगिरी साधल्याबद्दल विशेष पारितोषिकाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, असेही तांबडे म्हणाले. 
पोलिस उपनिरीक्षक नागेश मात्रे, विकी गायकवाड, प्रकाश गायकवाड, सहायक फौजदार जमादार, मुदगल, बाबर, भारत गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. 

विविध १५ गुन्ह्यांची कबुली 
चौघांनाही न्यायदंडाधिकारी यांच्याकडे ऑगस्ट रोजी उभे करण्यात आले. त्यांना ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. दागिने रामवाडी येथील भूषण नगरातील आपल्या घरात असल्याची माहितीही गणेश जाधव याने दिली. सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ, चेन, हार, अंगठ्या, कर्णफुले, कानपट्टी, चांदीचे वाळे, जोडवे, पैंजण असे दागिने असा एकूण ७९.५ तोळे सोन्याचे दागिने तर २३ तोळे चांदीचे दागिने इतका चोरीचा ऐवज मिळाला. 
बातम्या आणखी आहेत...