आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण सिद्धेश्वर निर्मितीच्या कार्याला येत आहे गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दैनिक दिव्य मराठीने मांडलेल्या सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेला हळूहळू मूर्तरूप येत असून निर्मितीकार्यास गती मिळत आहे. गर्भगृहात उभारण्यात येणारे दोन चांदीचे खांब मुख्य गर्भगृहाच्या बाहेर असणाऱ्या भागात करण्यात येणाऱ्या कोरीव कामासाठी सात कारागीरांसह अडीच हजार किलो टिकणारे बर्मा टिक लाकूड ही मंदिरात आले आहे.

श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्ती नंदीसमोर असणाऱ्या मोकळ्या भागात सोन्या-चांदीचा पत्रा चढवण्याचे काम या टप्प्यात होत आहे. बाह्यभागात सध्या उभारण्यात आलेल्या दोन चांदीच्या खांबांच्या उजवीकडे डावीकडे कोपऱ्यात दोन पाच फुटी खांब लावण्यात येत आहेत. मंदिराचे बांधकाम पुरातन शैलीतील असल्याने मूळ स्वरूपाला इजा करता, त्या त्या मोकळ्या भागात टिकणाऱ्या बर्मा टिक लाकडाचा थर चढवून त्यावर कोरीव काम करत चांदीचे पत्रे लावण्यात येणार आहेत. येथील नक्षीकाम बारीक नाजूक असल्याने हे काम करणाऱ्या सात कलावंतांचा चमू येथे दाखल झाला आहे.

लवकरच पूर्णत्वास येईल
सुवर्ण सिद्धेश्वर ही संकल्पना उत्कृष्ट असून त्याच्या पूर्णत्वास आम्ही प्रयत्नशील आहोत. भाविकांतून देणग्यांचा ओघ सुरू आहे. लाकडाच्या कोरीव कामाला सुरुवात होत असून अल्पावधीत सुवर्ण सिद्धेश्वर साकारेल. या नक्षीकामासाठी परगावचे कलावंत आणलेले आहेत.” धर्मराज काडादी, अध्यक्षश्री सिद्धेश्वर देवस्थान

बर्मा टिक लाकूड म्हणजे काय?
बर्माटिक वूड म्हणजे ब्रह्मदेशात उत्पादित झालेले सागवान लाकडापेक्षा दर्जाने सरस असणारे लाकूड. शिवाय या लाकडाचा वापर मोठ्या वास्तू, राजवाडे, किल्ल्यांमध्ये कलाकुसरीच्या कामांसाठी पूर्वी करत असत. सध्या राजवाड्यांत या लाकडाचा वापर होतो. हे लाकूड टिकाऊ असते पण हे लाकडू किमान ५० वर्षे टिकत असल्याने यास वाळवी किंवा किडे लागत नाहीत. पाणी लागले तरी लाकूड कुजत नाही, हे याचे वैशिष्ट्य आहे.