आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Railway Station Come On Google's Wi Fi List

सोलापूर रेल्वेस्थानक आले गुगलच्या वायफाय यादीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गुगलतर्फे भारतातील ५०० रेल्वेस्थानकांवर २०१६ पर्यंत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात १०० स्थानकांवर ही सुविधा मिळणार असून, त्यामध्ये सोलापूर रेल्वेस्थानकाचा समावेश आहे.

गुगलने यासंदर्भातील नकाशा प्रसिद्ध केला आहे.सुंदर पिचाई यांनी गुगलवरील आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, गुगल आणि भारतीय रेल्वे संयुक्तरीत्या हा प्रकल्प राबवणार आहे. त्याला प्रोजेक्ट निलगिरी असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात यातील १०० निवडक रेल्वेस्थानकावर वायफाय उपलब्ध होईल. त्यामुळे दररोज एक कोटी प्रवाशांना फायदा होईल. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी भारतात एक कोटी नागरिकांनी पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर केला. चीनमधील इंटरनेट ग्राहकांच्या तुलनेने ही संख्या कमी आहे. अजूनही भारतातील एक अब्ज नागरिक इंटरनेटच्या वापरापासून दूर असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे.

हायस्पीड वायफाय
रेल्वेस्थानकावरमिळणाऱ्या वायफाय सेवेचा वेग अतिजलद असेल. २४ तासांपैकी ३० मिनिटे ही सेवा मोफत उपलब्ध असेल. या ३० मिनिटांचा वेग इतका जलद असेल की अवघ्या दोन मिनिटांतच दोन तासांचा सिनेमा डाऊनलोड होईल.

सोलापूर स्थानकावर ३५ अॅक्सेस पॉइंट
भारतीयरेल्वेच्या रेलटेल कंपनी गुगलच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी रेलटेलच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वेस्थानकाची पाहणी केली. सोलापूर स्थानकावर ३५ ठिकाणी वाय-फायचे पॉइंट देण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात वायफाय सुविधा दिल्या जाणाऱ्या भारतातील शंभर रेल्वे स्थानकांचा नकाशा गुगलने आपल्या अिधकृत ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे.