आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ भारत: पुन्हा होणार सोलापूरचे सर्वेक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गतवर्षात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात शहराचा क्रमांक १२६ वर गेला. पुढील वर्षात शहराचा पुन्हा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. चार गुणांचा सर्व्हे असून, यात नागरिकांचा सहभाग ३५ टक्के असणार आहे. चार हजार पैकी पहिल्या टप्प्यात १४०० गुणांवर आधारित काम महापालिकेस करावे लागेल.
 
त्यासाठी महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी मनपा झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेत याबाबत माहिती दिली. जानेवारी महिन्यात केंद्राचे पथक येणार असून, त्यासाठी आतापासून महापालिकेने नियोजन करणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीत व्या क्रमांकावर असलेले शहर स्वच्छ भारतमध्ये १२६ व्या क्रमांकावर गेले. इंदौर शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये तीन टप्प्यात काम हाेणार आहे. यात महापालिकेने केलेले नियोजन, थेट निरीक्षण आणि नागरिकांचे मत याचा समावेश आहे. 
 
असे आहे नियोजन : संकलनवाहतुकीसाठी ४२० गुण असून, त्यात १३ प्रश्न अाहेत. कचरा संकलन वाहतूक करून विल्हेवाट लावण्यासाठी ३५० गुण आहेत. यात आठ प्रश्नावली आहे. हागणदारीमुक्तीसाठी ११ प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी ४२० गुण आहेत. 
 
प्रत्यक्षात काय? 
स्वच्छभारत मिशनमध्ये १२६ व्या क्रमांकावर शहर असून, पुन्हा सर्व्हे होणार असला तरी शहराची आजची परिस्थिती वेगळी आहे. हागणदारी मुक्तीसाठी महापालिकेने प्रयत्न केले. पण कचरा संकलन विल्हेवाट लावलीे जात नाही. शहर गावठाण आणि हद्दवाढ भागात कचरा साचलेला असतो. ओला सुका कचरा वेगवेगळे केले जात नाही. डब्यात कचरा टाकला जात नाही. अस्वाव्यस्त पडलेला असतो. कचरा संकलन करणे आणि त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. 
 
वर्गीकरण टक्केवारीत 
महापालिका नियोजन - ३५ 
पथकाकडून थेट पाहणी - ३० 
नागरिकांची मते - ३५ 
महापालिकेच्या नियोजनास १४०० गुण 
 
बातम्या आणखी आहेत...