आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Gives Permission To Use Emergency Road In Siddhrameshwar Yatra Solapur

सोलापुरच्या गड्डा यात्रेचा तिढा सुटला, रस्ता देवस्थानला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यासाठी िजल्हा प्रशासनाने राखून ठेवलेला साेलापुरातील होम मैदानाशेजारचा रस्ता यंदापुरता सिद्धेश्वर मंदिर समितीला वापरण्यास देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री परवानगी दिली. त्यामुळे यंदाही सिद्धरामेश्वराची गड्डा यात्रा निर्विघ्नपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री, सिद्धेश्वर मंदिर समिती आणि सोलापूर िजल्हा प्रशासन यांची बैठक झाली.

सोलापूरचे पालकमंत्री िवजयकुमार देशमुख यांनी बैठकीत वादाची सर्व पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांना िवशद केली. खासदार शरद बनसोडे यांनी सिद्ध्ेश्वर यात्रेची परंपरा सांगत सोलापूरच्या लोकभावनेची कदर करावी अशी िवनंती केली, तर दुसरीकडे, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर अाणि िजल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व सांगत प्रशासनाची भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कायदा महत्त्वाचा आहेच, पण लोकभावना िततकीच महत्त्वाची आहे’, असे नमूद करत यंदापुरता तो रस्ता मंदिर समितीला वापरण्यास देण्याचे आदेश िदले.

रस्ता मंदिर समितीकडे देण्यास कायदेशीर अडचणी येत असतील तर उद्याच्या उद्या अधिसूचना काढा असेही निर्देश जिल्हा प्रशासनाला िदले आहेत. गड्डा यात्रा संपल्यानंतर पुणे महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. ती समिती जो िनर्णय देईल, त्यानुसार पुढचा िनर्णय घेतला जाईल. तो रस्ता मंदिर समितीला देण्याचा िनर्णय यंदापुरता आहे. पुढच्या वर्षी मात्र आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी निश्चित होईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री िवजयुकमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, खासदार शरद बनसोडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार िशंदे, सोलापूर महापालिका आयुक्त िवजय काळम -पाटील, महापौर सुशीला आबोट, िजल्हाधिकारी तुकाराम मंुढे, पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर आदी उपस्थित होते.

गळाभेटीने आनंद
सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपून सोलापूरचे लोकप्रतिनिधी जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी भाजपचे शहर िचटणीस चन्नवीर चिट्टे यांना अक्षरश: मिठी मारत या निर्णयाचा िवजयोत्सव साजरा केला. तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे खास आभार मानले.