आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय रुग्णालयात लवकरच उपलब्ध होणार पोलिओची लस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून विविध औषधोपचार लस उपलब्ध करण्यात येते. अपंगत्व येऊ नये यासाठी पोलिओची लस तोंडातून देण्यात येते. आता ही लस इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येणार असून आठवडाभरात राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांत उपलब्ध होणार आहे. लस अधिक प्रभावीशाली असल्याने त्याने बालकांचे संरक्षण होणार आहे, असे प्रतिपादन आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्छिदानंद कामत यांनी केले.

शुक्रवारी बालाजी सरोवर येथे राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कामत बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. विजय येवले, डॉ. प्रमोद जोग, डॉ. हेमंत साठे, डाॅ. सुनील वैद्य, डॉ. विजय सावस्कर, डॉ. नितीन राठी, डॉ. संजय घोरपडे, डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. कुंदन चोपडे, डॉ. प्रशांत कुटे, डॉ. विजय तुटेजा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सुरुवातीला प्रीती साठे यांनी स्तवन पठण केले. बालरोग डॉक्टरांनी तळागाळातील समाजात असणाऱ्या बालरुग्णांवर उपचार करावा, तसेच बालरुग्णांवर उपचाराबरोबर पोषण आहारही चांगल्या प्रकारे मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. बी. रणपिसे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. सुनील वैद्य यांनी केले. प्रास्ताविक डॉ. हेमंत साठे तर आभार डॉ. संदीप कुलकर्णी यांनी मानले.

परिषदेचे चांगल्या प्रकारे नियोजन
डॉ. कामत म्हणाले, ""सोलापूरसह महाराष्ट्रातील बालरोग तज्ज्ञांची युनिटी चांगली आहे. परिषदेच्या प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. प्रत्येक डॉक्टर एकत्र काम करत आहेत. तसेच आयएपीचे नवीन कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले असून त्याचे उद््घाटन डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.''

राज्यस्तरीय बालरोग परिषदेच्या उदघाटन प्रसंगी डॉ. सच्छिदानंद कामत, डॉ. पुष्पा अग्रवाल, डॉ. विजय येवले, डॉ. प्रमोद जोग, डॉ. विजय सावस्कर, डॉ. नितीन राठी, डॉ. अतुल कुलकर्णी.

विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यशाळेत पहिल्या दिवशी सहा चर्चासत्रे झाली. नवजात शिशूंना होणारे विविध आजार, तसेच जन्मत: असणारे आजार या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच बालरोग तज्ज्ञांच्या स्वास्थ्याकरता योगा संदर्भातील व्याख्यानही झाले.