आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलऑफलाइन नाटक बंद करा, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारच्या छाताडावर बसू -डॉ. अजित नवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यावरून सरकार दिशाभूल करत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचे नाट्य करून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. ही ऑनलाइनची प्रक्रिया बंद करून सरकारने बॅँकेतील माहितीनुसार शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी सुकाणू समितीची असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, शेती मालाला हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी या मुद्द्यावर सुकाणू समिती पुढे जात आहे. या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारच्या छाताडावर बसू. या प्रश्नी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी सरकारने अनौपचारिक आमंत्रण देता रीतसर आमंत्रण द्यावे. कर्ज माफीबाबत सरकारने शब्द पाळला नाही. दहा हजार रुपये कर्ज देण्याचा मुद्दा समोर आणून सरकारने दिशाभूल केली आहे. शेतकऱ्यांना सहज सहभाग घेता येईल अशाच वेळी आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. काही शेतकरी नेत्यांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, डॉ. शिवानंद झळके, प्रा. महिबूब सय्यद, जावेद अवटे, महंमद शेख, खंडू वाघचवरे, रावसाहेब व्हनमाने, अनिल वासम आदी उपस्थित होते. 

स्थिती अशी 
- महाराष्ट्रातकोटी २५ लाख शेतकरी बॅँकेचे खातेदार 
- ४४ लाख थकबाकीदार 
- ४६ लाख शेतकरी नियमित बॅँकेचा व्यवहार करणारे 
- ३२०० लोकांना १०,००० कर्ज 
- शेतकऱ्यांवर लाख १५००० कोटींचे पीक कर्ज 

मुख्यमंत्र्यांकडून अशोभनीय वक्तव्य 
सुकाणूसमिती शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य शोभणारे आहेत. ते एका पक्षाचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये, अन्यथा इथून पुढे आमचे आंदोलनाचे लक्ष्य मुख्यमंत्रीच राहतील, असा इशारा श्री. नवले यांनी दिला. 
बातम्या आणखी आहेत...