आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजित शासकीय जलतरण तलावातील डायव्हिंग बोर्ड चुकीचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रस्त्यावरील नियोजित शासकीय जलतरण तलाव चुकीच्या पद्धतीने बांधला असून त्यातील डायव्हिंग बोर्डही चुकीचे केले आहेत. त्यामुळे या तलावावर राष्ट्रीयच नाही तर राज्य स्पर्धाही होऊ शकत नसल्याची खंत जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष झुबिन अमारिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. याबाबतचा तपशीलवार अहवाल त्यांनी नूतन जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांंच्याकडे दिला.
सहा महिन्यापूर्वी चुकीच्या पद्धतीने बांधकाम होत असल्याचे पत्र देऊन सुद्धा तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी कोणतीही कारवाई केली नाही. सोलापुरातून आतापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय डायव्हिंग खेळाडू निर्माण झाले ते महापालिकेच्या जलतरण तलावांमुळेच. आम्ही शासनाची डायव्हिंगची अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्यामार्फत प्रयत्न केले. परंतु हा तलावच वेळेत पूर्ण झाला नाही. त्यामुळे ही क्रीडा प्रबोधिनी पूर्ण होण्याचे आमचे स्वप्नच राहणार असल्याचे अमारिया यांनी सांगितले. घटनाक्रम : दोनकोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक, २०११ ला भूमिपूजन, पंढरपूरच्या सलीम कन्स्ट्रक्शनला काम दिले, दोन वर्षाची मुदत, सुरुवातीपासून पुण्याच्या सिंथेसिस डिझायन या वास्तुविशाद कंपनीची नियुक्ती, एक वर्षाची मुदत वाढ देऊनही काम पूर्ण झाल्यामुळे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठेकेदारास लाख ६० हजारांचा दंड, त्याचवेळी खासगी वास्तुविशारदची नियुक्ती संपवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम सोपविले, एप्रिल २०१६ मध्ये ३८ लाख ५० हजार रुपयांचा अतिरिक्त निधी दिला.

^तलाव बोर्ड चुकीचे आहेत, असा अहवाल जिल्हा जलतरण संघटनेकडून प्राप्त झाला आहे. या संदर्भात काय निर्णय घायचा यासाठी १० ऑगस्टला क्रीडा संकुल समितीची बैठक आहे.'' युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी

^वास्तुविशारद म्हणूनमी कामास सुरुवात केल्यानंतर २०११ ला ठेकेदारास ड्रॉईंग दिले आहे २०१३ मध्ये स्ट्रक्चरल ड्रॉईंग दिले आहे. डायव्हिंग बोर्डचे काम माझ्या काळात झाले नाही. तसा तपशीलवार अहवाल यापूर्वीच मी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांना दिला आहे.'' शशिकांत चिंचोळी, वास्तुविशारद

^सलीम कन्स्ट्रक्शनकडे२०११ मध्ये टेंटेटिव्ह २०१३ मध्ये फायनल असे दोन ड्रॉईंग दिले होते. त्यामुळे २०१३च्या ड्रॉईंगनुसार अाम्ही काम केले आहे.'' श्रीहरी पंचवाडकर, ठेकेदार

तलावाची लांबी एक फुटाने कमी
^उदयोन्मुखखेळाडूंसाठी मीटर स्प्रिंग बोर्ड लागतो. हायबोर्डची रुंदी कमी असल्यामुळे डायव्हर्सला पळत जाऊन डाइव्ह मारता येणार नाही. टेकऑफही घेता येणार नाही. तलावाची लांबी सहा इंचही कमी असेल तर राज्य स्पर्धा होत नाहीत. लांबी एक फुटाने कमी अाहे. झुबिन अमारिया, अध्यक्ष, जिल्हा जलतरण संघटना
बातम्या आणखी आहेत...