आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवर्षण परिस्थितीत टाळा ग्रा.पं.निवडणुकीचा धुरळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पावसानेदडी मारल्याने जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. गावपातळीवर या निवडणुकांमळे वातावरण पूर्णत: ढवळून निघते. तसेच पैशांची वारेमाप उधळपट्टी होते. हे प्रकार टाळून गावविकासाला चालना मिळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बनिविरोध काढण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनीही निवडणुका बनिविरोधसाठी "होकार' दर्शवला आहे. परंतु, नेहमीप्रमाणेच जागा वाटपावरून बनिविरोधचे घोडे अडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकशाहीमध्ये निवडणुकांना विशेष महत्त्व दिले जाते.एखाद्या उत्सवाप्रमाणेच उमेदवार, राजकीय पक्ष निवडणुकांना सामोरे जातात. परंतु, इतर कोणत्याही निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायतची निवडणूक निराळी मानली जाते. या ननिवडणुकीमुळे अनेक ठिकाणी वाद विकोपाला गेल्याचे दिसून येते. प्रसंगी रक्तरंजित हाणामा-याही होतात. तसेच गावपातळीवर वैरभाव निर्माण होण्यास या निवडणुका कारणीभूत ठरल्याचा इतिहास आहे. या निवडणुकीत मतदारसंख्या कमी असते. तसेच एकमेकांविरुद्ध लढणारे उमेदवारही जवळचेच असतात. अनेकदा विजयी होणाऱ्या किंवा पराजित होणाऱ्या उमेदवारांमध्ये एक ते दोन मतांचा फरक असतो. त्यामुळे निकालानंतर खऱ्या वादाला तोंड फुटते. कधी दोन गट समोरासमोर एकमेकांशी भिडतात, तर काहीवेळा मनात खुन्नस धरण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून कुरघोड्यांचे राजकारण होते. यातून संबंध ताणले जाऊन वाद विकोपाला पोहोचतो. यातून गावातील सामाजिक, आर्थिक वातावरण दूषित होते. त्यामुळे उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुका विकोपाचे कारण ठरल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी ग्रामविकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बनिविरोध करण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे वितंडवादही कमी होतील. निवडणुकीत होणारा खर्च वाचण्यास मदत होईल. यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मध्यंतरी जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उमरगा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती बनिविरोध काढून विकासाला चालना देण्याचे आवाहन केले होते. अन्य राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणूक बनिविरोध काढण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ४२२ ग्रामपंचायतच्या निवडणुका
^पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागात भयाण चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुका बनिविरोध काढण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच ही काळाची गरज आहे. गावस्तरावरील प्रमुखांनी यासाठी पुढाकार घ्यावा. निवडणुका बनिविरोध काढणाऱ्या ग्रामपंचायतला विशेष वाढीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. निवडणुका बनिविरोध झाल्यास प्रशासनावरील खर्चाचा ताण कमी होईल. तसेच गावात सामंजस्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. '' राणाजगजितसिंहपाटील, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. यावेळी शक्यतो बनिविरोधसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. बनिविरोध निवडणूक शक्य झाल्यास शिवसेना,भाजप आणि रिपाइंने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. निवडणुकांसाठी वातावरण पोषक नसल्याचे चित्र आहे.'' सुधीरपाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

पावसाने हुलकावणी दिल्याने ग्रामीण भागात अत्यंत बिकट स्थिती बनली आहे. तसेच विद्यमान सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत शक्यतो बनिविरोध काढण्यास सांगितले आहे. अन्य पक्षांशी तडजोड करावी. समविचारी पक्ष एकत्र आल्यास निवडणुका बनिविरोध होतील.'' अप्पासाहेबपाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

गावाच्या सर्वसमावेशक विकासासाठी तेसच गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार कोणी करत असेल तर त्याला निश्चितच प्रोत्साहन देण्यात येईल. दुष्काळी पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतच्या निवडणुका बनिविरोध काढण्यासाठी कुणी प्रयत्न केल्यास भाजपकडून त्यांचे स्वागत आहे. पक्षभेद विसरून एकत्रिकरणास पाठिंबा राहिल.'' नितीनकाळे, जिल्हाध्यक्ष, भाजप.
सर्वसमावेशक सदस्यांची बॉडी निवडावी

लोकशाहीमध्येनिवडणुकांच्या माध्यमातून सदस्य निवडून जाणे अपेक्षित आहे. परंतु, गावपातळीवरील कारभार चालवण्यासाठी सुशिक्षित विकासाभिमुख युवकांना प्राधान्य दिल्यास निश्चितच गावाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. त्यामुळे पक्ष, जात-धर्म असा भेद करता सर्वसमावेशक सदस्यांची निवड करण्यासाठी गावा-गावातील ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

पक्षांनी दंड थोपटले
पक्षाचीराजकीय ताकद वाढवण्यासाठी गावपातळीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यातून पैशांचा महापूर येऊन ग्रामीण भागात मटनावळी आणि दारूचे पाट वाहण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेसह विधानसभा निवडणुकीमध्ये बळकटी येण्यासाठी ग्रामपंचायतीकडे लक्ष दिले जाते. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते निवडणुका बनिविरोध काढण्यासाठी पुढाकार घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जागा वाटपावरून अडते घोडे
ग्रामपंचायतनिवडणुका बनिविरोध काढण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न होतात. परंतु, जागा वाटपावरून मतभेद होतात. त्यामुळे बनिविरोध निवडणुका होता चुरस वाढते. हा वाद मिटवण्यासाठी गावातील ज्येष्ठांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. दरम्यान, गावपातळीवर वाद नको म्हणून अनेकजण निवडणुकांपासून लांब राहात असल्याचे दिसून आले आहे. शौचालय नसणे असूनही वापर नसणे या कारणावरून अनेक सदस्य अपात्र ठरले होते. या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनी पाठ फिरवली होती.

निवडणुका बनिविरोध झाल्यास..
- ग्रामपंचायतींच्या निवडणुका बनिविरोध झाल्यास निवडणुकांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचेल.
- गावातील पॅनलने एकत्र येऊन निवडणुका बनिविरोध काढल्यास गावात सलोखा कायम राहण्यास मदत होईल.
- तसेच निवडणुका जिंकण्यासाठी होणारा वारेमाप खर्चही टाळता येऊ शकतो.