आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहासाठी अनुदान, स्थितीची पडताळणी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहर हागणदरीमुक्त करण्यासाठी आॅक्टोबर २०१७ पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ज्या कुटुंबांकडे स्वच्छतागृह नाही त्यांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी दोन टप्प्यांत अनुदान देण्यात येत आहे. महापालिका निधीचे वाटप सुरू केले. पण बांधण्यासाठी लाभार्थ्यांनी काय प्रयत्न केले याची पडताळणी प्रत्यक्षात करत नसल्याचे दिसून येते.
शहरात उघड्यावर बसणारे २४ हजार ९१५ कुटुंब असून त्यापैकी सहा हजार ८५३ जणांना दोन टप्प्यात अनुदान वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे अनुदान वाटप सुरू आहे.

गेल्या वर्षी आॅक्टोबरपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात हागणदारीमुक्त शहर ही संकल्पना पुढे करून शहरात उघड्यावर जाणार नाही याची खबरदारी घेणे, ज्यांच्याकडे नाही त्यांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान देणे अशी योजना आहे. त्यापूर्वी महापालिकेने शहरात पाहणी करून आराखडा तयार केला. एकूण २४ हजार ९१५ जणांकडे स्वच्छतागृह नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सहा हजार ८५३ लाभार्थींना अनुदान वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी स्वच्छतागृह बांधकामात गैरप्रकार झालेला होता.

पण बांधकामाचे काय? : स्वच्छतागृहबांधण्यासाठी महापालिका प्रत्येक लाभार्थीस सहा हजार रुपये आॅनलाइन त्यांच्या खात्यावर जमा करीत असून, बांधकाम करण्यासाठी काय उपाययोजना केली याची खात्री महापालिका करताना दिसून येत नाही. यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्वच्छतागृह बांधण्यात आले. त्यात अपहार झाला. असे असताना पुढे खबरदारी म्हणून महापालिकेकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

(२०१५ च्या जनगणनेनुसार, कंसात २०११ च्या जनगणनेनुसार)
अशी सुरू आहे कार्यवाही
आलेलेमागणी अर्ज : २८६०५
प्रत्यक्षात लाभार्थी : २४९१५
अनुदान मिळालेले : ६८५३
आवश्यक निधी : ७.२५कोटी
मिळालेला निधी : ४.११कोटी
महापालिकेच्या प्रांगणात ठेवलेले विविध आकार-प्रकारातील स्वच्छतागृहांचे नमुने.
स्वच्छतागृहांची कुटुंबवार स्थिती
एकूण कुटुंब संख्या : १९३९२०(१८४९७१)
स्वच्छतागृहअसलेले : १२१८२५(११९४२८)
स्वच्छतागृहनसलेले : ७२०९५(६५५४३)
सामुदायिकवापरणारे : ४७१८०(४१०२९)
उघड्यावरजाणारे : २४१९५(२४५१४)

पूर्वीची यादी पाहून अनुदान वाटप नाही
आधीच्या अनुदान वाटपाची यादी महापालिकेकडे नाही. असले असते तर दुबार लाभार्थीची यादी महापालिकेकडून तयार करता आली असती. अनुदान वितरित होण्यापूर्वी निर्माण होणारा संशय दूर झाला असता. मात्र, महापालिकेकडे अशी व्यवस्था नाही. त्यामुळे गैरप्रकाराची शक्यता आहे.

^स्वच्छता गृह नसलेल्यांना बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येत आहे. त्यांच्याकडून हमी पत्र घेण्यात येत आहे. दुसऱ्यांदा लाभ घेताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.” प्रदीप साठे, सहाय्यकआयुक्त, आरोग्य विभाग, महापलिका