आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कुत्र्यांचेे करायचे काय? शहरात कुत्र्यांचा त्रास सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. त्यास हॉटेल, मच्छी, मटन स्टॉलसह चायनीज खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या तसेच कचरा कुंडीत, गल्ली-बोळात मोठ्या प्रमाणावर फेकले जाणारे अन्न कारणीभूत ठरत आहे. महापालिकेची यंत्रणा निर्बिजीकरणाचे काम प्रभावी करत नसल्याने पैसा खर्चूनही वाया जात आहे. त्यामुळे या श्वानांचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चायनीज खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या एका जागीच उभ्या असतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर उष्टे उकिरड्यावर फेकले जाते. याच अन्नावर भटक्या श्वानांचे पोषण होते. साहजिकच संख्या वाढते. शहरात पार्क चौक, डफरीन चौक स्टेट बँक जवळ, भय्या चौक, गुरू नानक चौक, ७० फूट रोड, कुमठा नाका, लक्ष्मीनारायण टॉकीज आकाशवाणीजवळ, विजापूर रस्त्यालगत सैफुल, आयटीआयजवळ, संभाजी तलावजवळ, दावत चौकजवळ, होटगी रस्ता, आसरा चौक कॉर्नर, डीमार्ट, अशोक चौक, वालचंद कॉलेज परिसर, जोडबसवण्णा चौक, अक्कलकोट नाका, जुना बोरामणी नाका, अरविंद धाम रोड, रिलायन्स मार्केट, विडी घरकुल, हत्तुरे वस्ती विमानतळसमोर आदी विविध ठिकाणी चायनीज गाड्यांचे स्पॉट बनले आहेत. या सर्व ठिकाणी भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मच्छी मार्केट, विजापूर वेस, पेंटर चौक मटन पॉइंट, मंगळवार बाजार आदी ठिकाणी भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.

अन्न टाकण्याची ठिकाणी : जुनाएम्प्लाॅयमेंट, सात रस्ता, बाळीवेस, कन्ना चौक, एस. टी. स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी कचरा कुंडीत मोठ्या प्रमाणावर अन्न टाकण्यात येते.

^महापालिकेच्या वतीनेफेरीवाल्यांना परवानगी दिली जाते. त्यांनी एकाच ठिकाणी उभे राहून विक्री करु नये. फिरुन विकावे. त्यानुसार परवानगी दिली जाते.” चंद्रकांत करजगी, मनपामंड्या विभाग प्रमुख
झोपडपट्टी परिसरात श्वानांची संख्या अधिक
शहरात झोपडपट्टी आदी भागात श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून येते. तेथे मोठ्या प्रमाणावर मिळत असलेले अन्न याचे मुख्य कारण आहे. उघड्यावर शौच विधी करणे, शिळे अन्न उकिरड्यावर फेकणे ही येथील सहज प्रवृत्ती आहे.

पिसाळलेल्या श्वानाची लक्षणे
सुसाटपळतो, कोणावरही हल्ला करतो, जिभे बाहेर काढून फिरतो., नेहमीपेक्षा अधिक लाळ येते. , नेहमीच्या हालचालीत फरक पडतो

चावल्यावर घ्यावयाची काळजी
श्वानचावल्यास नळाखालील पाण्यात जखम धुऊन घ्यावी, तातडीने संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधावा., डॉक्टर म्हणतील त्या वेळेनुसार चुकता डोस घ्यावेत.

योग्यवेळी उपचार केल्यास रेबीज बरा होऊ शकतो
^श्वान पिसाळलेला असल्याचे महापालिका निश्चित करते. त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यानुसार रुग्णांवर औषधोपचार करतो. श्वानाचा साधा चावा असेल तर त्यास ए. आर. व्ही. डोस देतात. चावा मोठा असेल आणि जखमेतून रक्तस्राव झाला असेल तर ए.आर.एस. डोस दिला जातो. हे दोन्ही डोस वेळेवेर चुकता घेतले तर रेबीज होण्याची शक्यता कमी असते.” डॉ. एस. के. मनगुळीकर, जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग

पालिकेकडून प्रतिसाद नाही
^नागरिकांना श्वान चावल्यानंतर महापालिकेला थोडी जाग येते. अशा श्वानांना ताब्यात घेतलं पाहिजे. वेगळ्या जागी ठेवले पाहिजे. अनेकदा नागरिकांचे वेगवेगळ्या भागातून फोन येतात. आम्ही श्वानाला ताब्यात घेतो. माहिती देऊनही महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नाही. श्वानांचे निर्बिजीकरण करण्यास आणखी एका केंद्राची गरज आहे. ही बाब महापालिका आयुक्तांच्या निर्दशनाला आणून दिली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.” पप्पू जमादार, सदस्य,नेचर कॉन्झरवेशन सर्कल

गृहिणींकडूनही हातभार
शिळे अन्न श्वानांना खाऊ घालण्यासाठी घराबाहेर ठेवण्यात येते. श्वानांची वाढलेली संख्या सर्वच नगरात दिसते. या अन्नावर भक्कम ताव मारलेले भटके श्वान परिसरात नागरिकांवर गुरगुरतात. असे अन्न उघड्यावर टाकण्यापेक्षा एकत्र करून योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. झोपडपट्टी परिसरात श्वानांची संख्या अधिक
बातम्या आणखी आहेत...